दिव्यांगांना मासिक पेन्शन देणारी मलकापूर नगरपालिका ही राज्यात एकमेव – changbhalanews
राज्य

दिव्यांगांना मासिक पेन्शन देणारी मलकापूर नगरपालिका ही राज्यात एकमेव

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मलकापूर पालिकेने शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी 2018 सालापासून महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना सुरु केली असून, राज्यामध्ये अशा प्रकारची दिव्यांगांना मासिक पेन्शन देणारी एकमेव पालिका म्हणून ओळखली जाते.दिव्यांगांना नववर्षाची भेट म्हणून 5 टक्के दिव्यांग राखीव निधी अंतर्गत त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे.

शहरातील दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे करुन दिव्यांगत्वाच्या आधारे मासिक पेन्शन योजना प्रतिमहिना संबंधित व्यक्तींच्या खात्यावर पालिका कर्मचाऱयांच्या वेतनाबरोबर जमा केली जाते. यापूर्वी पालिकेने मासिक पेन्शनबरोबरच शहरातील दिव्यांग महिलांना घरघंटी, शिलाई व पिकोफॉल मशिनचे वितरण केले होते.
दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन औषधासाठी येणाऱया खर्चाचा विचार व त्यांचे आर्थिक उत्पन्न या बाबींचा विचार करून पालिकेने 5 टक्के दिव्यांग राखीव निधी अंतर्गत शहरातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांग टक्केवारीनुसार महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना कार्यरत ठेवली आहे.

या योजने अंतर्गत 40 ते 79 टक्के दिव्यांगत्व असणाऱया लाभार्थींना मासिक 700 व 80 ते 100 टक्के दिव्यांगत्व असणाऱया लाभार्थींना 1000 मासिक पेन्शन व पूर्णपणे बेडरेस्ट आहेत व त्यांची सुश्रृषा करावी लागते अशा व्यक्तींना 1000 तसेच (स्व.)भास्करराव शिंदे विद्यावेतन योजनेंतर्गत शिक्षण घेत असणाऱया दिव्यांग विद्यार्थ्यांना 1000 पेन्शन लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केली जाते. शहरातील एकूण 127 लाभार्थींना प्रतिमहिना 1,04,800/- खर्च केला जातो.
वाढत्या महागाईचा विचार करता दिव्यांग व्यक्तींच्या मासिक पेन्शन योजनेमध्ये वाढ करणेबाबत, पालिकेने निर्णय घेऊन त्यास एकमताने मान्यता देऊन वाढ केली आहे. 40 ते 79 टक्के दिव्यांगत्व असणाऱया लाभार्थींना 1000 तसेच 80 ते 100 टक्के दिव्यांगत्व असणाऱया लाभार्थींना 1500 तसेच (स्व.)भास्करराव शिंदे विद्यावेतन योजनेंतर्गत शिक्षण घेणाऱया दिव्यांग विद्यार्थ्यांना 1500 तसेच पूर्णपणे बेडरेस्टवर आहेत व त्यांची सुश्रृषा करावी लागते अशा व्यक्तींना 2000 रूपये देण्यात येणार आहेत. ही वाढ 1 जानेवारीपासून लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

याबद्दल नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापतीप्रशांत चांदे, महिला व बालकल्याण समिती सभापती कमल कुराडे, उपसभापती नंदा भोसले, मुख्याधिकारी प्रताप कोळी तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका व श्रीमती शाहीन मणेर, विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी वैभव आरणे यांचे आभार मानले आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close