भारतीय संविधानाचा 75 वा अमृत महोत्सव महाराष्ट्र शासनाने साजरा करावा – जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कलाकार संघटना यांच्यावतीने घरनिकी येथे मुलांना खाऊ वाटप -
चांगभलं ऑनलाइन | आटपाडी प्रतिनिधी
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त घरनिकी येथे रिपाई कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे यांनी आयोजित केलेल्या अंगणवाडीतील मुलांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात व संघटक नवनीत लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खाऊ वाटप व शालेय पोषण आहार साहित्याचे वाटप करण्यात आले.
सांगली जिल्हा संघटक नवनीत लोंढे, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड तुषार लोंढे, ज्येष्ठ नेते भीमराव कदम, जेष्ठ नेत्या नंदाताई खैरमोडे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार सुनील तोरणे व महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी तोरणे व कलाकार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी केले.
अंगणवाडी मुलांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, स्वतंत्र दिनाचा 78 वा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होतोय तसा भारतीय संविधानाचा 75 वा अमृत महोत्सव महाराष्ट्र शासनाने साजरा करावा. स्वातंत्र दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून लहान मुलांना खाऊ वाटप व इतर साहित्याचे वाटप करून सुनील तोरणे यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुनील तोरणे नेहमीच सामाजिक उपक्रम , विविध कार्यक्रम करत असतात आपल्या माणदेशातील जवान आपला भारत देश सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर आपल्या जीवाची परवा न करता लढत असतात, त्या जवानांचे खऱ्या अर्थाने आपण स्मरण केले पाहिजे. स्वातंत्र प्राप्तीसाठी शहीद झालेल्या लाखो सैनिकांची माहिती गावगाडा , वस्तीपर्यंत सांगितली पाहिजे. संविधानाचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय देशातल्या विधिमंडळ आणि संसदेने केल्यास एक सर्वात मोठा गौरव ठरेल, असे यावेळी जिल्हाध्यक्षांनी सांगितले.
अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजित ऐवळे, खानापूर तालुकाध्यक्ष नवनीत लोंढे, महिला आटपाडी तालुकाध्यक्ष नंदाताई खैरमोडे, सुष्मिता मोटे मॅडम, आदींनी मनोगत व्यक्त केले.
सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, मुस्लिम आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष बशीर भाई मुजावर, आटपाडी तालुका कार्यकारणी सदस्य सुरेश वाघमारे, खानापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे, उपाध्यक्ष शरद घाडगे, रोजगार आघाडी खानापूर तालुका उपाध्यक्ष महेश पवार, आयटी सेल तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी तोरणे, सचिन ऐवळे, शहाजी तोरणे, दत्ता तोरणे, धनाजी तोरणे, प्रियंका तोरणे, विशाल लालासो तोरणे, शामराव मेटकरी, अधिक बुधा तोरणे, जगन्नाथ एवळे, कलाकार गणेश भिसे, सागर मोहिते, खटाव तालुका अध्यक्ष गणेश मंडले, अमोल सकट, भिमराव कदम, अंगणवाडी शिक्षिका नंदा खैरमोडे, सरोज कदम, राणी महामुनी, सत्यवान चव्हाण, सुखदेव खांडेकर, यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.