यादवराव तथा अंकलजी सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर – changbhalanews
Uncategorized

यादवराव तथा अंकलजी सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीकडून घोषणा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती,महाराष्ट्र राज्य (कराड)या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव तथा अंकलजी सोनवणे (पुणे)यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे,अध्यक्ष प्रमोद तोडकर (आण्णा),कार्याध्यक्ष अमोल (आप्पा)भोसले,
नियोजन समिती अध्यक्ष राम दाभाडे,ॲड. विशाल देशपांडे,सुरज घोलप,जयवंत सकटे, भास्कर तडाखे,सचिव हरिभाऊ बल्लाळ,सह सचिव सौ.निलम लोंढे,गजानन सकट,प्रा. पै.अमोल साठे,संजय तडाखे,रमेश सातपुते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
(फुले पगडी ,मानपत्र,सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)

मातंग समाजामध्ये बुद्ध,कबीर,फुले ,शाहू आंबेडकर व लहुजी साळवे यांचे विचार रुजविण्याचे काम यादवराव तथा अंकलजी सोनवणे यांनी केले आहे.समाजातील आठरा पगड जाती जमाती,भटके विमुक्त आदिवासींना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले तर पुरंदर तालुक्यातील लहुजी साळवे यांच्या कुलभूमीत लहुजींचा पुतळा उभारण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहेच त्याचबरोबर मातंग समाजात आंबेडकरवाद रुजविण्याचा मोलाचा वाटा आहे.

सदरचा पुरस्कार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल ) येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्यामध्ये ख्यातनाम राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर)यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close