चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
नारायणवाडी ता. कराड गावचे हद्दीतील पाचवड फाटा येथील राजस्थानी स्विट होम समोर दिनांक 19 फेब्रुवारी.2021 रोजी साडेआठच्या सुमारास आरोपी रामप्रसाद ऊर्फ रामु परमेश्वर गोस्वामी वय 41 रा रामप्रसाद खेडा, ता नटखेडा, जि लखनऊ राज्य उत्तर प्रदेश याने रवी अशोक यादव वय 32 रा पाचवड फाटा ता. कराड मुळ रा उत्तर प्रदेश यास पाण्याची मोटर बंद करणेचे कारणावरून चिडून जावून बर्फ फोडणेचे लाकडी दांडके डोकीत मारून त्याचा खून केला होता. या खटल्यात रामप्रसाद गोस्वामी यास दोषी धरून सत्र न्यायाधीश आण्णासाहेब पाटील यांनी जन्मठेपेची व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास कराड तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व हवालदार डी.एम. कोळी यांनी केला होता. हा खटला. सत्र न्यायाधीश आण्णासाहेब पाटील यांचे न्यायालयात चालला. सुनावणी दरम्यान तपासातील पंच, साक्षीदार व वैद्यकीय पुरावे यांचेबाबबत सहा. सरकारी अभियोक्ता एम. व्ही. कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी रामप्रसाद ऊर्फ राम परमेश्वर गोस्वामी रा रामप्रसाद खेडा, ता नटखेडा, जि लखनऊ राज्य उत्तर प्रदेश यास जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला.
सदर गुन्हयाचे तपास व शावीतीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाप्रमाणे उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या सुचनेप्रमाणे कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी गुन्हा शाबीतीसाठी पाठपूरावा केला असून सदर गुन्हयात सरकारी पक्षाचेवतीने युक्तीवाद सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी स. फौ. मदने, महिला पोलीस अर्चना पाटील यांनी सहकार्य केले.