चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शेणोली (सम्राटनगर ) ता. कराड येथील ज्येष्ठ नागरिक कृष्णा ज्योती गायकवाड (मौला तात्या, वय 90 वर्षे ) यांचे दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी सायं 4.30 वा. अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
ते मौला तात्या नावाने सर्व परिचित होते. ते शेणोली ग्रामपंचायतीचे 15 वर्षे सदस्य, शेणोली सोसायटीचे 10 वर्षे संचालक व व्हा. चेअरमन होते. यशदाचे प्रवीण प्रशिक्षक, ‘मी नागरिक फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व बहुजन समाज पार्टीचे कराड दक्षिणचे उमेदवार राहिलेले विद्याधर गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा जलदान व पुण्यानुमोदन कर्यक्रम सोमवार दि 2 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजता शेणोली ता. कराड येथे होणार आहे.