लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यास कृष्णा बँक सदैव तत्पर : डॉ. सुरेश भोसले
कराडमधील वाखाण रोड येथे कृष्णा बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून दिली. त्यांच्याच विचाराने वाटचाल करत असलेली कृष्णा सहकारी बँक लोकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कराडमधील वाखाण रोड येथे कृष्णा सहकारी बँकेच्या २१ व्या नूतन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या नूतन शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, आप्पा माने, महादेव पवार, सुहास पवार, राजू मुल्ला, बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, दिलीपराव पाटील, दिलीप घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, सहकारात मध्यंतरी अनेक बँका निर्माण झाल्या व अनेक बंदही पडल्या. सहकारी संस्थांमध्ये संचालकांना मोठ्या जबाबदारीने काम करावे लागते. आपली बँक प्रमाणिकपणे काम करते. सहकारी संस्थेत संचालकांना विश्वस्ताच्या भूमिकेने काम करावे लागते, तरच संस्थेची प्रगती होत असते. कराडकरांना कृष्णा बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल.
कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले, की गेल्या अनेक वर्षांत आपल्या बँकेने उत्कृष्टपणे व पारदर्शकपणे कारभार केला आहे. तसेच येत्या काळात संस्थेचा विस्तार करून, लोकांना त्यांच्या विविध गरजांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद मारुती पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, हणमंतराव पाटील, प्रमोद गुणवंतराव पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी प्रास्तविक केले. पोपट देसाई यांनी सूत्रसंचालन केले. दामाजी मोरे यांनी आभार मानले.