खटावला तहसील कार्यालयातील लिपिकाने घेतली ५५ हजाराची लाच – changbhalanews
क्राइम

खटावला तहसील कार्यालयातील लिपिकाने घेतली ५५ हजाराची लाच

अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

चांगभलं ऑनलाइन | वडूज
खडी क्रश सॅण्ड व क्रश खडी भरून वाहतूक करताना खटाव तहसीलदारांनी जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी डंपर मालकाकडे 55 हजार रुपयांची लाच मागताना तहसील कार्यालयातला लाचखोर लिपिक लाचलुचपक प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात अडकला. ही कारवाई बुधवारी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी वडूज येथे करण्यात आली.

प्रविण धर्मराज नांगरे, वय -४२ वर्ष, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा. पद – महसूल सहाय्यक, तहसिल कार्यालय, (वडूज) खटाव, ता. खटाव, जि सातारा, वर्ग -३ असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईत ताब्यात घेतलेल्या खटाव तहसील कार्यालयातील लिपिकाचे नाव आहे. याबाबत बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय असलेल्या बत्तीस वर्षे डंपर मालकाने लाचलचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याची पडताळणी मंगळवार दिनांक २१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करून बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी (वडूज) खटाव तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला होता.

या घटनेची हकीकत अशी, यातील तक्रारदार यांचे मालकीचे दोन डंपर असून ते बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतात. यातील तक्रारदार यांचे दोन्ही डंपर दि.१६ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रश सॅण्ड व क्रश खडी भरून वाहतूक करीत असताना तहसिलदार खटाव यांनी तक्रारदार यांचे दोन्ही डंपर जप्त केले होते. सदरचे दोन्ही डंपर सोडविण्यासाठी तहसिल कार्यालय खटाव येथील लोकसेवक नांगरे यांनी स्वतःसाठी तक्रारदार यांना डंपर सोडविणेकरीता ५५ हजाराची लाच मागणी करून ती लाच रक्कम स्विकारल्याने लोकसेवक नांगरे यांना ताब्यात घेण्यात आले.

या सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक (अतिरिक्त कार्यभार) सचिन राऊत, पोलीस निरीक्षक विक्रम पवार,
पो. हवा. नितीन गोगावले, पो.ना. गणेश ताटे, पो.ना. निलेश राजपुरे, म.पो.ना. प्रियांका जाधव, पो.कॉ. निलेश येवले, पो.कॉ. तुषार भोसले, म.पो.कॉ. शितल सपकाळ यांचा समावेश होता.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close