श्री क्षेत्र कुंभारगाव येथील श्री निलाताई चंद्राताई देवीची उद्या (सोमवारी) कार्तिकी (पाकळणी) यात्रा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
श्री क्षेत्र कुंभारगाव (Sri Kshetra Kumbhargaon) ता. कडेगाव जि. सांगली येथील मठात श्री निलाताई-चंद्राताई देवीची (Sri Nilatai Chandratai Devi) कार्तिकी यात्रा (Yatra) पाकळणी (Pakalani) ) उद्या, सोमवार दि.11 मार्च व मंगळवार दि. 12 मार्च 2024 रोजी भरणार आहे.
सोमवार दि. 11 रोजी सायंकाळी 7:15 वाजता देवीची आरती (सेवा) होईल. त्यानंतर कार्तिकीचा (सव्वा महिन्याचा) उपवास पुरणपोळीचा गोडवा नैवद्य दाखवण्यात येणार आहे. सर्वांना मेव्याचा प्रसाद वाटप झाल्यानंतर भक्तांचा सव्वा महिन्याचा उपवास सुटणार आहे. याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री ठीक 9:00 वाजता महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले सर्व पोतराज (Potraj) व इतर कलाकार यांचा देवीच्या गीतांचा कार्यक्रम होईल.
दुसऱ्या दिवशी मंगळवार, दि.12 मार्च 2024 रोजी सकाळी 8:00 वाजता देवीची आरती व सेवा होईल. त्यानंतर देवीला खारा नैवद्य व प्रसाद होईल. या कार्तिकी (Kartiki) यात्रेसाठी देवीचे वंशज श्री चंद्रकांत रामकृष्णराव पाटील ( धर्माधिकारी), श्री तम्मासाहेब रामकृष्णराव पाटील, श्री बाबासाहेब येलगुर्दराव पाटील, श्री संजीव यलगुर्दराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
तरी भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी व कार्तिकी यात्रेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन देवीचे मानकरी पोतराज श्री सुनिल भिमराव तोरणे (घरनिकी) (Sunil Torane) यांच्यासह श्री सोनू दिलीप साठे (कराड) यांनी केले आहे.