कराडच्या ‘या’ शिक्षक पत्रकारासह दोघांचा मायभूमीत झाला सन्मान
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येरवळे येथील याग सेवा संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त याग जीवनगौरव पुरस्कार आयटीसी लिमिटेड बेंगलोरचे व्हाईस प्रेसिडेंट शिरीष यादव तर येरवळे याग भूषण पुरस्कार शिक्षक व पत्रकार सुनीलकुमार परीट यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला..
संस्थेचे आधारस्तंभ डॉक्टर एम. बी. पवार, प्रसिद्ध तबलावादक सुनील राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पाटील, माजी बालकल्याण सभापती विजया माने, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक राजू मुल्ला , ज्येष्ठ नागरिक कैलास यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती..
मायभूमीत मिळालेला पुरस्कार हा इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा सर्वोच्च पुरस्कार आहे. याग सेवा संस्थेचा हा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मत पुरस्काराने सन्मानित केलेले शिरीष यादव व सुनील परीट यांनी व्यक्त केले. यावेळी याग सेवा संस्थेच्या माध्यमातून श्लोक कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी तसेच शिरीष यादव यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सकाळच्या सत्रात यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी याग सेवा संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सर्जेराव यादव, जितेंद्र जाधव, राजेश यादव, जयप्रकाश परीट यांच्यासह संचालकांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप यादव व रमेश यादव यांनी केले. यावेळी राजू मुल्ला, सुनील राजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी योग सेवा संस्थेचे सर्व सदस्य तसेच येरवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.