कराडला कर्तबगार महिला पोलीस अधिकाऱ्यांचा अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान – changbhalanews
Uncategorized

कराडला कर्तबगार महिला पोलीस अधिकाऱ्यांचा अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दातृत्वाला आणि कर्तृत्वाला इतिहासामध्ये तोड नाही - पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्यावतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचेवतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले. याप्रसंगी अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ९ कर्तबगार महिला अधिकाऱ्यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली. आजही त्यांच्या विचारानुसार, आदर्शानुसार या देशांमध्ये कारभार सुरू आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण, मुत्सद्दीपणा, झुंज घेण्याचा खंबीरपणा, प्रजाहित, अचूक न्याय व्यवस्था, बाणेदार वृत्ती, कल्याणकारी विचारसरणी असे अनेक सदगुण होते. त्यांच्या दातृत्वाला आणि कर्तुत्वाला इतिहासात तोड नाही.

याप्रसंगी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचेवतीने सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सहायक पोलिस निरीक्षक तब्बसुम शादीवान, जयश्री वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा आमले, पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील, पोलीस उपनिरीक्षक शितल माने, वाहतूक महिला पोलीस सोनम पाटील, निर्भया पथकाच्या दिपाली पाटील यांचा अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार, कराडचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासो गावडे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य प्राचार्य उत्तमराव गलांडे, कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात, विश्वास चौगुले, बाबासो काकडे, अवधुत पाटील, मंदार कदम, सुरेश काकडे, अर्जुनराव चव्हाण उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close