कराड अर्बन बँकेची १०८ वी वार्षिक सभा २० जुलै रोजी; पाच नवीन शाखांना परवानगी
सभासदांनी उपस्थित राहावे – अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांचे आवाहन

कराड प्रतिनिधी , दि. १८ | चांगभलं वृत्तसेवा
दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. पंकज मल्टीपर्पज हॉल, कराड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी माहिती देताना सभासदांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
पाच नवीन शाखांना आरबीआयची परवानगी
बँकेच्या प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक मोलाची भर पडली असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पाच नव्या शाखा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. सध्या कार्यरत ६७ शाखांमुळे एकूण शाखांची संख्या ७२ वर जाणार आहे.
वाढता व्यवसाय आणि डिजिटल सेवा यशस्वी
डॉ. एरम यांनी सांगितले की, बँकेने मागील आर्थिक वर्षात ५८०० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करत ‘शून्य टक्के एनपीए’ राखण्यात यश मिळवलं आहे. तसंच मोबाईल बँकिंग व यूपीआय सेवा प्रभावीपणे कार्यान्वित झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सभेची पूर्वसूचना पाठवलेली
या सभेची नोटीस सर्व सभासदांना वैयक्तिक पत्त्यावर पाठवण्यात आली आहे. सभेला हॉटेल पंकजच्या मागे, कोल्हापूर नाक्याजवळील पंकज मल्टीपर्पज हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर
या वेळी माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, कराड अर्बन कुटुंब सल्लागार सीए. दिलीप गुरव, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.