कराड येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विजय स्तंभावर मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण व शहिद जवानांना मानवंदना

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने विजय स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहिद जवानांना मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात झाले. कराड नगरपरिषद, कराड चे मुख्याधिकारी श्री. प्रशांत व्हटकर यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शहिद जवानांच्या विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी “भारत माता की जय, झाडे लावा झाडे जगवा, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, संचालक विनायक विभुते, सहसचिव विलासराव जाधव, प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. बी. एस. खोत, प्रा. रजनिश पिसे, प्रा. महालिंग मुढेंकर, शिंदे सर, अलंकार उद्योग समूहाचे जयदिप अरबुने, माजी नगर अभियंता ए. आर. पवार, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. जालिंदर काशीद, रजिस्ट्रार सालवाडगी सर, संतोष पवार, दैनिक सकाळ कराड कार्यालयाचे उपसंपादक हेमंत पवार, मान्यवर पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, माजी सैनिक अधिकारी, श्रीमती मालती बागवे, निर्मला शिंगण, शितल पवार, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप चे सदस्य, एनव्हायर नेचर क्लबचे सदस्य, चिल्लर पार्टी चित्रपट चळवळीचे पदाधिकारी, एस. जी. एम. कॉलेजमधील एनसीसी कॅडेट, विठामाता विद्यालयाचे विद्यार्थी, नगरपरिषदेचे कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.