संस्थापकांच्या मूल्यांवर चाललेली शतकोत्तर वाटचाल – शिक्षण मंडळ, कराडचा ‘गुरुगौरव समारंभ’ उज्ज्वल परंपरेचा साक्षीदार!

कराड प्रतिनिधी, दि. १२ | चांगभलं वृत्तसेवा
संस्थापकांच्या मूल्यांवर चाललेली शतकोत्तर शैक्षणिक वाटचाल हीच शिक्षण मंडळ, कराडची खरी ताकद असून, हे कार्य आजच्या काळातही प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी काढले.
शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने आयोजित गुरुगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, “संस्थापकांच्या तत्त्वांवर आधारलेली शैक्षणिक बांधिलकी जपणे, ही काळाची गरज आहे. शिक्षणाच्या नव्या आव्हानांसमोर टिकून राहण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण अत्यावश्यक आहे.”
या समारंभात डॉ. भोसले यांना कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, सर्व संचालक, कृष्णा अभिमत विद्यापीठ व उद्योग समूहातील पदाधिकारी व कर्मचारी, तसेच शिक्षण मंडळाच्या विविध शाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त शिक्षक, संस्था व विद्यार्थी यांचा गौरव:
समारंभात खालील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले:
डाॅ. मोहन राजमाने – विद्यारत्न पुरस्कार, रयत शिक्षण संस्था, कराड
प्रमोद संकपाळ – साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह
डॉ. स्नेहल राजहंस – आदर्श शिक्षिका पुरस्कार, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक
सुषमा इंदुलकर – आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार, अडरे
डॉ. सतीश भिसे – आदर्श प्राध्यापक पुरस्कार, औषध निर्माण महाविद्यालय
प्रकाश पागनीस – उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार, पुणे
उदय कुंभार – उत्तम शिक्षक पुरस्कार, टिळक हायस्कूल
ज्योती ननवरे – उत्तम शिक्षक पुरस्कार, टिळक हायस्कूल (प्राथमिक)
शारदा चव्हाण – उत्तम सेवक पुरस्कार, इंग्रजी माध्यम शाळा
सानिका गरुड – आदर्श विद्यार्थी पुरस्कार, टिळक हायस्कूल
अशोक पवार – सेवाव्रती पुरस्कार, कराड नगरपरिषद
जीवन थोरात – विज्ञान शिक्षक पुरस्कार, टिळक हायस्कूल
राजवीर भुंजे – ऑल राऊंडर पुरस्कार, टिळक हायस्कूल
अनया कांबळे – ऑल राऊंडर पुरस्कार, लाहोटी कन्या प्रशाला
देवांश रैनाक – क्रीडा पुरस्कार, इंग्रजी माध्यम शाळा
शब्बो इद्रसी – क्रीडा पुरस्कार, इंग्रजी माध्यम शाळा
क्षणचित्रे :
गुरुगौरव समारंभाची सुरुवात लोकमान्य टिळक व देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. लाहोटी कन्या प्रशालेच्या संगीत विभागाने गुरुगौरव गीत सादर केले. स्वागतपर मनोगत बाळासाहेब कुलकर्णी यांनी, प्रास्ताविक चंद्रशेखर देशपांडे यांनी, तर पाहुण्यांचा परिचय अनघा परांडकर यांनी करून दिला.
डॉ. सतीश भिसे, डॉ. मोहन राजमाने व डॉ. अनिल हुद्देदार यांनीही प्रतिनिधीक मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आदिती जोशी व सुचेता पाटील यांनी केले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण मंडळ कराडच्या सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी सर्वांचे आभार मानले.