कराड उत्तर, कराड दक्षिणचे खर्च पडताळणी निरीक्षक श्री. पी. सेंथील साताऱ्यात दाखल – changbhalanews
राजकिय

कराड उत्तर, कराड दक्षिणचे खर्च पडताळणी निरीक्षक श्री. पी. सेंथील साताऱ्यात दाखल

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत सातारा जिल्हयातील २६२- सातारा, २५९ कराड उत्तर, २६०- कराड दक्षिण व २६१ पाटण या विधानसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरिक्षक म्हणून श्री. पी सेंथील (आर २७३८५) यांची नियुक्ती करणेत आलेली असुन ते आज दिनांक २२.१०.२०२४ रोजी साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांचे निवासाचे ठिकाण सातारा येथील नवीन विश्रामगृह ईमारत पहिला मजला सुट नं. २ या ठिकाणी आहे. त्यांचे संपर्काची माहिती खालीलप्रमाणे

Constituency Fax No. :- ०२१६२-२३४८०१
Constituency Telephone No :- ०२१६२-२३२४६७
Constituency Mobile No :- ९४०३४७२४४२
E-mail id :- eosatara२०२४०ne@gmail.com

उपरोक्त चारही विधानसभा मतदारसंघातील राजकिय पक्ष प्रतिनिधी व नागरीक यांचे संपर्कासाठी श्री. सेंथील वरील ठिकाणी दररोज दूपारी ३ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. आज दिनांक २२.१०.२०२४ रोजी श्री.पी सेंथील यांनी पहिल्याच दिवशी २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणूकीचे कामासाठी नियुक्ती केलेल्या सर्व पथकातील नोडल ऑफिसर यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये २६२- सातारा विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन सर्व नोडल ऑफिसर यांना श्री. सेंथील यांनी कामकाजा बाबत आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले. तदनंतर श्री. सेंथील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी २६२ सातारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग सातारा यांचे कार्यालयास व नामनिर्देशन कक्ष, cvigil पथक कक्ष तसेच सिंगल विंडो कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला सुचना केल्या. तसेच चालू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यापुढे उर्वरीत उपरोक्त मतदारसंघामध्ये सुध्दा त्यांचा पाहणी दौरा होणार असुन संपूर्ण विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक खर्च विषयक बाबींवर नियंत्रण ठेऊन ते आयोगास वेळोवेळी अहवाल सादर करणार आहेत अशी माहिती खर्च विषयक निरिक्षक श्री. सेंथील यांचे वतीने .श्री. सुधाकर भोसले निवडणूक निर्णय अधिकारी २६२ सातारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग सातारा निवडणूक निर्णय अधिकारी २६२ सातारा यांनी दिली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close