दोन वर्ष तडीपार असलेल्या एकाला कराडच्या डीबी पथकाने केली अटक
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी रात्री हद्दपार असतानाही कराड परिसरात वावरताना आढळून आलेल्या पोलीस रेकॉर्डवरील एकाला अटक केली. आबीद आलम मुजावर रा. मंगळवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा असे त्याचे नाव आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आबीद आलम मुजावर रा. मंगळवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा व त्याचा एक साथिदार यांना कराड शहर पोलीसांनी 02 वर्षासाठी हद्दपार केले आहे. सदर दोघांना सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यात प्रवेशासाठी मनाई असताना देखील आबीद आलम मुजावर हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील हायवे लगत असलेल्या कोल्हापुर नाका येथे छुप्या स्वरुपात वावरत असल्याची बातमी कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील यांनी तात्काळ डी. बी. पथकासह कोल्हापुर नाका याठिकाणी दाखल होवुन तडीपार संशयित आबीद आलम मुजावर यास सापळा रचुन ताब्यात घेत अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सहाय्यक फौजदार देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली.