कराड शहर डीबी पथकाने रोखली चेन स्नॅचिग धारधार शस्त्र व मुद्देमालासह एक आरोपी अटक
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना कराड शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे रोखण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक कराड शहराचे वेगवेगळया भागात पथक तयार करुन प्रतिबंधक गस्त करीत होते.
दि. 08 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हे पकटीकरण पथक कराड शहर तसेच उपनगरात चेन स्नॅचिंगचे अनुषंगाने प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे गोपनीय बातमीदाराने मलकापुर ते ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एक इसमाने चाकुचा धाक दाखवुन महिलेच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावुन घेवनु पळाल्याचे माहिती दिली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकास तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास नागरीकांचे मदतीने शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीचे ताब्यातुन एकुण 30,000/- रुपये किंमतीची अर्ध्या तोळयाची सोन्याची चेन व धारधार शस्त्र जागीच जप्त करण्यात आले आहे.
सुरेश सिध्दाप्पा दौडमणी वय 30 वर्षे रा. कोयना वसाहत मलकापुर ता. कराड जि. सातारा असे संशयीताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील (कराड शहर पोलीस ठाणे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक पवार, सफौ. रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, वाहतूक शाखेचे हवालदार पाटणकर, हवालदार संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.