कराडच्या सौ. चेतना पाटील (चव्हाण) यांना संधिवात विषयावर संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी

कराड | चांगभलं वृत्तसेवा
सौ. चेतना ज्ञानदेव पाटील (चव्हाण) यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. विजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली “संधिवात” या विषयावर त्यांनी संशोधन केले असून त्यांच्या शोधनिबंधास विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.
सौ. चेतना पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल, कराड येथे झाले. त्यानंतर एस.जी.एम. ज्युनिअर कॉलेज कराड येथे अकरावी-बारावी पूर्ण केली. गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड येथे त्यांनी डिप्लोमा तर डिग्री आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली येथे पूर्ण केली. पुढे एम.फॉर्म त्यांनी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथे पूर्ण केले.
अतिशय शांत व संयमी स्वभावाच्या सौ. पाटील यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.