ब्रह्मदास विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – changbhalanews
शैक्षणिक

ब्रह्मदास विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कराड प्रतिनिधी, दि 21 जून 2025| चांगभलं ऑनलाइन

बेलवडे बुद्रुक (ता. वाठार) येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन एक प्रेरणादायी आणि सात्त्विक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य साधणारी जीवनशैली आहे. याच भावनेने विद्यालयात योग दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि प्रेरणादायी विचारांनी झाली. मुख्याध्यापक श्री. जे. बी. माने सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “योग म्हणजे आत्मशुद्धीची वाटचाल असून, तो मन, मेंदू व शरीर यांच्यात सुसंवाद निर्माण करतो.” त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात क्रीडा शिक्षक श्री. बी. डी. पोरे आणि योग मार्गदर्शक रंगराव कुंभार यांनी वृक्षासन, ताडासन, भुजंगासन, वज्रासन यांसारखी विविध योगासने प्रात्यक्षिकातून दाखवत विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले.

सहाय्यक शिक्षक श्री. पी. टी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “योगामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मनःशांती आणि स्मरणशक्ती यामध्ये लक्षणीय वाढ होते. तो शिक्षण प्रक्रियेतील मानसिक शांतीचा स्रोत आहे.”
कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. त्यांनी उत्साहाने सहभाग घेत योग दिनाला खऱ्या अर्थाने उत्सवाचे स्वरूप दिले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close