निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार यांच्याकडून 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रियेत 259 उत्तर विधानसभा मतदासंघाच्या निवडणूक कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी भारतीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी केली.प्रसंगी 259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे,डॉ.जस्मिन शेख,तहसीलदार अनिकेत पाटील,मध्यवर्ती अधिकारी,पोलीस अधिकारी,कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक पोलीस निरीक्षकांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी करून स्ट्रॉंग रूमचे मध्यवर्ती अधिकारी तहसीलदार अनिकेत पाटील यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली.स्ट्रॉंग रूममध्ये क्लोज सर्किट टीव्ही नियंत्रण कक्षास भेट देऊन मतदान यंत्राच्या सुरक्षेविषयी माहिती घेतली.निवडणूक कार्यालयातील सुरक्षा विषयक नियोजनासंबंधी व सुरक्षा विषयक उपाययोजनांच्याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे यांनी निवडणूक पोलीस निरीक्षकांना माहिती दिली.निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सुरक्षाविषयक उपायोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या कायदा व सुव्यवस्था संदर्भात तक्रारींसाठी निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार यांच्या 9423184175 भ्रमणध्वनीवर नागरिकांनी संपर्क साधावा.