निवडणूक निरीक्षक प्रदीप शर्मा यांचेकडून कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची व स्ट्रॉंग रूमची पाहणी – changbhalanews
राजकिय

निवडणूक निरीक्षक प्रदीप शर्मा यांचेकडून कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची व स्ट्रॉंग रूमची पाहणी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
45 सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 22/04/2024 रोजी निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रदीप शर्मा (आय पी एस) यांनी भेट मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कराड येथील स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले. स्थिर पथकाच्या मालखेड येथील चेक पोस्टलाही त्यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

निवडणूक निरीक्षक प्रदीप शर्मा यांचे स्वागत विक्रांत चव्हाण, (सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी )(महसूल) व अतुल म्हेत्रे (सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड) यांनी पुष्पगुच्छ देवुन केले. कराड मतदार संघामधील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तालुक्यामधील काले व कराड शहरातील जिल्हा परिषद शाळा क्र. 7 व जिल्हा परिषद शाळा क्र. 12 येथील मतदान केंद्राची पाहणी करुन सहायक निवडणुक निर्णय अधिकारी कराड उत्तर व कराड दक्षिण तसेच पोलीस अधिकारी यांना मतदान केंद्राबाबत सुचना दिल्या. तसेच कराड 259 उत्तर व कराड 260 दक्षिण या दोन्ही मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेचे अनुषंगाने कराड येथील विश्रामगृह येथे बैठक घेऊन तालुक्यामधील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

  • मालखेड येथील चेक पोस्टला भेट….
    निवडणूक निरिक्षक शर्मा यांनी कराड तालुक्यामधील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउददेशीय केंद्र येथील 259 कराड उत्तर मतदारसंघाचे कार्यालय व स्ट्राँग रूम ला भेट देऊन पाहणी केली. तसेच 260 कराड दक्षिण मतदारसंघाचे कार्यालय व रत्नागिरी गोडाऊन येथील स्ट्रॉग रुम ला भेट देवून पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. भेटी दरम्यान निवडणूक निरीक्षक शर्मा यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाच्या तासवडे व मालखेड येथील चेकपोस्टला भेट देवून पाहणी केली.

निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रदीप शर्मा (आय पी एस) यांनी 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण या मतदार संघामध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी विक्रांत चव्हाण, (सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महसूल), अतुल म्हेत्रे, (सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कराड), विजय पवार (तहसिलदार कराड तथा अति सहा निवडणूक निर्णय अधिकारी कराड उत्तर), श्रीमती स्मिता पवार, तहसिलदार संगांयो, अति सहा निवडणूक निर्णय अधिकारी कराड दक्षिण, कौस्तुभ गव्हाणे मुख्याधिकारी रहिमतपूर, अनिकेत पाटील परिविक्षाधिन तहसिलदार, आनंद देवकर महसुल नायब तहसिलदार, निवडणूक कामी कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी / कर्मचारी हे उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close