कराडच्या वाढीव भागाला १९४ कोटींचा रस्ते आराखडा; राजेंद्रसिंह यादव यांची माहिती
दौलत व रेव्हेन्यू कॉलनीत 'फेज टू'च्या कामांचा शुभारंभ

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहराच्या हद्दवाढ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १९४ कोटी रुपयांचे काँक्रीट रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या असून, या भागाचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केले.
दौलत आणि रेव्हिन्यू कॉलनी या भागांमध्ये भुयारी गटार योजनेच्या फेज टू मधील कामांचा शुभारंभ श्री. यादव यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. यादव म्हणाले की, “शहराच्या हद्दवाढ भागात आधी घरे झाली आणि नंतर मागणीप्रमाणे सुविधा पुरवल्या जात आहेत. मात्र नियोजनशून्य वाढ झाल्यामुळे पाणी पुरवठा आणि ड्रेनेजच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी २०५६ पर्यंतची लोकसंख्या गृहित धरून नवीन पाणी योजना व भुयारी गटार योजना राबवण्यात येत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने कराड शहरासाठी ३२५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी सुमारे २०० कोटी रुपये हद्दवाढ भागासाठी आहेत. या भागात ११ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार असून, कमी दाबाने पाणीपुरवठ्याची समस्या दूर होणार आहे.”
रस्ते कामांबाबत माहिती देताना यादव यांनी सांगितले की, “१९४ कोटींच्या प्रस्तावित रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना गटारींचीही कामे करण्यात येणार आहेत. हे सर्व प्रकल्प हद्दवाढ भागाच्या वेगवान नागरीकरणाला चालना देतील.”
कार्यक्रमाला माजी नगरसेवक निशांत ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज इंगवले, विनोद भोसले, अनिस भालदार, प्रवीण पवार, मुसा मुजावर, फैजल बागवान, इस्माईल मुल्ला, कादर नाईकवाडी, टिपू मुल्ला, गाडे सर, कांबळे साहेब, आसिफ शेख, शाहरुख मुल्ला, समीर दिवाण, रियाज मोमीन, अयान शेख, सैफ मुजावर, विक्रम मोहिते, अदनान शेख आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी केला यादव यांचा सत्कार…
कार्यक्रमादरम्यान हद्दवाढ भागातील विकास कामे मंजूर केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराज इंगवले व प्रवीण पवार यांची विशेष उपस्थिती होती.
📎चांगभलं न्यूजला सोशल मीडियावर फॉलो करा!
🕊️ X (Twitter):
Follow करा 👉 @ChangbhalaNews
📢 ताज्या अपडेट्स, व्हायरल थ्रेड्स आणि ब्रेकिंग न्यूजसाठी!
📸 Instagram:
Follow करा 👉 instagram.com/changbhala.news?igsh=cTQwMzB3ZXBoOHpu
🎥 ग्राउंड रिपोर्ट्स, रील्स आणि बातम्यांचे व्हिज्युअल कव्हरेज – फक्त Instagram वर!
📘 Facebook:
Like करा 👉 facebook.com/profile.php?id=61552122239763
📲 तुमच्या परिसरातील लाईव्ह अपडेट्स, थेट प्रसारण आणि विशेष बातम्यांसाठी आम्हाला Facebook वर Like करा! Youtube वर सबस्क्राईब करा, महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या डेलीहंट अकाउंटला ही भेट द्या.
📌 #ChangbhalaNews – तुमच्या गावाची, तुमच्या मनातली बातमी