Uncategorized
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचे सैदापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत अनोखे रक्षाबंधन

कराड, दि. १० | चांगभलं वृत्तसेवा
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या वतीने सैदापूर ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासोबत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधण्यात आल्या तसेच भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात क्लबच्या प्रेसिडेंट सारिका शहा, सेक्रेटरी निमिषा गोर, तसेच सदस्य छाया पवार, श्रुती जोशी, अंजना माने, दिपाली लोहार, रतन शिंदे, डॉ. शैलजा कुलकर्णी, हेमलता फुटाणे, मनीषा पाटील, अपूर्वा पाटणकर, मृणाल जोशी, सुषमा तिवारी, अनिता शुक्ला, नंदा आवळकर, अलका शिंदे, जया सचदेव, विद्या शहा, मुस्कान तलरेजा, सुनीता देसाई, सविता जाधव इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्यामुळे सणाचा सामाजिक आणि स्नेहबंध अधिक दृढ झाला.