इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा १२वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न; डॉ. किमया शहा यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीने घेतला पदभार

कराड प्रतिनिधी, दि.१४ | चांगभलं वृत्तसेवा
कराडमधील वेणूताई चव्हाण हॉलमध्ये इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा १२वा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास लोटस फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. किमया शहा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात सारिका शहा यांनी अध्यक्षपदाचा तर निमिषा गोर यांनी सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. पास्ट प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर, उपाध्यक्ष माहेश्वरी जाधव, संयुक्त सचिव डॉ. शैलजा कुलकर्णी, कोषाध्यक्ष सोनाली पाटील, ISO श्रुती जोशी, संपादिका अंजना माने, C.C. सपना लूनिया यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्य छाया पवार, सुषमा तिवारी, दिपाली लोहार, सारिका वेल्हाळ, मनीषा पाटील, मृणाल जोशी यांनी पदग्रहण केले.
रतन शिंदे व शिवांजली पाटील यांनी मेंबरशिप डेव्हलपमेंट ऑफिसर तर पुष्पा चौधरी, तरुणा मोरे आणि विद्या पावस्कर यांनी पी.आर.ओ. म्हणून पदभार स्वीकारला. हेमलता फुटाणे व मंगल शहा यांची ऑनररी मेंबर म्हणून निवड झाली.
कार्यक्रमाची सुरुवात चारुल पाटील हिने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. मावळत्या अध्यक्ष अपूर्वा पाटणकर यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा दिला. नवनिर्वाचित अध्यक्ष सारिका शहा यांनी क्लबच्या पुढील वर्षातील सेवा प्रकल्पांची संकल्पना मांडली.
क्लबमध्ये नव्याने सामील झालेल्या सदस्यांची ओळख तरुणा मोहिरे यांनी करून दिली. सविता जाधव, आयूषा पाटील, सुनीता देसाई, डॉ. शिल्पा पाटील, डॉ. संगीता यादव, सुवर्णा यादव, मोहिनी कलबुर्गी, रजनी भोंगाळे, सुवर्णा केंजळे, डॉ. अनिता पाटील, जयश्री पवार यांचे स्वागत पिन प्रदान करून करण्यात आले.
कार्यक्रमात “तेजस्विनी बुलेटिन” चे प्रकाशन अंजना माने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजसेवेतील कार्याबद्दल दादा शिंगण यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी छाया पवार यांनी त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
सुषमा तिवारी यांनी श्री संभव जीन संगीत मंडळ यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली, तर अध्यक्ष अभयकुमार शहा यांचा देखील समाजसेवेसाठी सन्मान करण्यात आला. पाहुण्यांची ओळख आशा सावंत यांनी केली.
प्रमुख पाहुण्या डॉ. किमया शहा यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि क्लबच्या कार्याचं कौतुक केलं. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शैलजा कुलकर्णी यांनी केलं तर आभार प्रदर्शन मृणाल जोशी यांनी केलं.
कार्यक्रमास कराड नगरीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, विद्या मोरे, रोटरी क्लब कराड, इनरव्हील क्लब ऑफ कराड, इनरव्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइज, हास्य क्लब, यशराज महिला मंच अध्यक्षा नंदा विभुते, DNM CEO मनोज पाटील, रेवती बर्गे, रेखा काशीद, जीवन पवार, संकल्प शहा यांच्यासह अनेक मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते.
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचे नंदा आवळकर, भाग्यश्री पाटील, अनिता शुक्ला, अश्विनी भंडारे, अरुणादेवी पाटील, शिल्पा पवार, आशा सावंत, सुकेशनी कांबळे, विद्या शहा, रूपाली तपासे, जया सचदेव, मुस्कान तलरेजा आदी सदस्यांनी सहभाग नोंदवला.