इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड अर्बन बँक च्या शताब्दी हॉल मध्ये इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी 313 डिस्ट्रिक्टच्या संगमनेरच्या पास्ट प्रेसिडेंट सुनिता कोडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नूतन अध्यक्ष अपूर्वा पाटणकर सचिव सारिका शहा आय पी पी तरुणा मोहिरे उपाध्यक्ष छाया पवार ,जॉईन सेक्रेटरी सुषमा तिवारी, ट्रेझर दिपाली लोहार ,आयएसओ सारिका वेल्हाळ, एडिटर निमिषा गोर, सी सी विद्या शहा , एक्झिक्युटिव्ह कमिटी मध्ये पुष्पा चौधरी , डॉ.आशा सावंत ,नंदा आवळकर ,सुकेशनी कांबळे ,अनिता शुक्ला ,मेंबरशिप डेव्हलपमेंट ऑफिसर मध्ये माहेश्वरी जाधव ,श्रुती जोशी ,अंजना माने .पब्लिक रिलेशन ऑफिसर यामध्ये रतन शिंदे, शिवांजली पाटील यांची निवड करण्यात आली .ऑनररी मेंबर म्हणून मळई देवी पतसंस्था अध्यक्ष अरुणादेवी पाटील आणि महिला मर्चंट पतसंस्था अध्यक्ष कविता पवार यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात माहेश्वरी जाधव आणि श्रुती जोशी यांनी गणेश वंदना करून केली व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व इनरव्हील प्रार्थनेने झाली. प्रमुख पाहुणे सुनीता कोडे व मान्यवरांचे स्वागत अध्यक्षा अपूर्वा पाटणकर व सचिव सारिका शहा यांनी केले.
मावळत्या अध्यक्ष तरुणा मोहिरे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या सेवा कार्याचा आढावा सादर केला. नवनिर्वाचित अध्यक्षा अपूर्वा पाटणकर यांनी तरुणा मोहिरे यांच्याकडून कॉलर ,पीन व चार्टर स्वीकारून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. तसेच मावळत्या सचिव छाया पवार यांच्याकडून सचिव पदाचा कार्यभार सारिका यांनी स्वीकारला .इनरव्हील परिवारात नव्याने सामील झालेल्या विद्या शहा ,सारिका वेल्हाळ, सारिका कुंभार, सपना लुनिया ,अनिता शुक्ला, अनिता सुतार, तेजस्विनी पाटील ,शिल्पा कुलकर्णी मनीषा पवार ,सीमा करंजे ,प्राजक्ता देसाई ,निमिषा गोर ,शिल्पा पवार ,रूपाली तपासे, डॉ.शैलजा कुलकर्णी यांचे पीन प्रदान करून स्वागत करण्यात आले .
मागील वर्षात डोकावताना केलेल्या कार्याचा आढावा मांडणारे तेजस्विनी बुलेटिन व प्रकाशन एडिटर स्वाती देवकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नूतन अध्यक्षा अपूर्वा पाटणकर यांनी आपल्या मनोगतांमधून आगामी वर्षात राबवणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला महिला सक्षमीकरण अंतर्गत जास्तीत जास्त प्रोजेक्ट सर्व सदस्यांच्या सहकार्यातून करणार असल्याबाबत आश्वासित केले.
यावेळी सचिव सारिका शहा यांच्या सासुबाईंच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वजना इतक्या वह्या वाटप छत्रपती शिवाजी विद्यालय येथील मुलांना करण्यात आले .
कार्यक्रमावेळी कराड मधील विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक संस्थेंना इनरव्हील समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी यशराज महिला मंच च्या अध्यक्ष नंदा विभुते व पदाधिकारी, जनजाती वनवास कल्याण आश्रम या संस्थेचे अध्यक्ष डॉ.अंजली शहा व गुरसाळे सर आणि पदाधिकारी ,शिवराय प्रतिष्ठान कराडचे अध्यक्ष ब्रिजेश रावळ आणि पदाधिकारी ,वृक्षप्रेमी संस्था आगाशिवगड या संस्थेचे अजित सांडगे सर व पदाधिकारी यांना शाल ,श्रीफळ ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख अंजना माने यांनी केली. प्रमुख पाहुणे सुनिता कोडे यांनी नूतन टीमला शुभेच्छा देऊन क्लबच्या कायमस्वरूपी धान्य बँक या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच आपल्या मनोगतातून त्यांनी महिला सक्षमीकरण टीम वर्क प्रोजेक्ट कसे करायचे ते सुचित केले.
कार्यक्रमास कराड नगरीतील सर्व संस्थांचे मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशा सावंत यांनी केले तर व्हॉइस प्रेसिडेंट छाया पवार यांनी आभार मानले .ऑनररी मेंबर आणि नवीन मेंबर ची ओळख मृणाल जोशी यांनी करून दिली यावेळी श्रद्धा दाभोळकर यांनी वृक्षप्रेमी संस्थेची ओळख करून दिली. इनर व्हील क्लब ऑफ कराड संगमचे सदस्या विद्या पावसकर,मनीषा पाटील, अश्विनी भंडारी , अश्विनी पवार,सोनाली पाटील,अलका शिंदे, जया सचदेव,मुस्कान तरलेजा, संगीता पाटील हे सर्वजण उपस्थित होते .