कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम असून कमळाचा आपल्या भागात उपयोगच नाही – बिरू कचरे – changbhalanews
राजकिय

कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम असून कमळाचा आपल्या भागात उपयोगच नाही – बिरू कचरे

कासारशिरंबे येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा संवाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: स्व. विलासराव पाटील- उंडाळकर काका यांनी रयत संघटना स्थापन केली. वाडी- वस्तीवर काकांचा निष्ठावंत कार्यकर्ता आजही उदयदादांच्या सोबतीने पृथ्वीराज बाबांना आमदार करणारच आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेसचा हात सक्षम असून कमळ विझवायचं काम करेल, असा विश्वास रयत संघटनेचे बिरू कचरे यांनी व्यक्त केला. 

कासारशिरंबे (ता. कराड) येथील कार्यकर्त्यांशी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी पांडुरंग बोद्रे, कराड तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष जयवंत पाटील, प्रा. धनाजी काटकर, अजित पाटील- चिखलीकर, रयत कारखान्याचे संचालक जयवंत बोंद्रे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक शंकर यादव, धनाजी थोरात, देवदास माने यांच्यासह रयत संघटनेचे तसेच काॅंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस च्या व्यासपीठावर सर्व नेते एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली तेव्हा अशा वेळी आपल्या देशाला घटना आवश्यक होती अशा परिस्थितीत काॅंग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना तयार करण्यासाठी विनंती केली. आज संविधान बदलण्याचा डाव भाजपाने आखला मात्र, देशातील जनेतेने तो हाणून पाडला. लोकसभेला भाजपाला एकहाती सत्ता पाहिजे होती, ती लोकांनी दिली नाही. आता महाराष्ट्रातही भाजपाला सत्ता मिळणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सत्तेत येणार आहे. 

अजित पाटील- चिखलीकर म्हणाले, अतुल भोसलेचे बोर्ड लागलेत इथून पाणंद ते तिथपर्यंत पाणंद आणि तिथून पाणंद ते इंथपर्यंत पाणंद रस्ता करणे त्यांची वर्कआॅर्डर आहे का? अस लोकांनी विचारलं पाहिजे. विलासकाकांनी डोंगरी भागात पाणी आणलं. पृथ्वीराज बाबा हे आंतरराष्ट्रीय किर्तीचा माणूस तुमच्या पुढे उभा आहे. कृष्णा कारखाना, कृष्णा चॅरिटेबल काॅंग्रेसच्या काळात उभे राहिले अन् हे महाशय विचारतायत काॅंग्रेसने काय केले. यशवंतराव मोहिते भाऊंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.    

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close