कराड मधील ईदगाह मैदान प्रश्नावर सकारात्मक निर्णय – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 23 | चांगभलं वृत्तसेवा
कराड येथील ईदगाह मैदानावर दफणविधी, रमजान ईद व बकरी ईद निमित्त सार्वजनिक नमाज पठणासाठी येणाऱ्या अडचणींवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कराड येथील ईदगाह जमिनी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, तसेच कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, “जागेची पाहणी पोलीस अधीक्षकांनी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तेथील रस्ता नगर परिषदेच्या माध्यमातून तयार केला जाईल.”