वाहनचालक असाल तर महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नाने जर्मनीत नोकरीची संधी… अर्ज असा करा! – changbhalanews
Uncategorized

वाहनचालक असाल तर महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नाने जर्मनीत नोकरीची संधी… अर्ज असा करा!

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाहन चालकांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 10 हजार कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने यंत्रणा कार्यपद्धती व प्रशिक्षणाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठित करण्यात आलेली आहे. कराराप्रमाणे बाडेन वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी परिवहन विभागामार्फत पुढीलप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सदर प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या QR CODE वर स्कॅन करुन त्यावर दिलेल्या प्रवेशप्रक्रियेबाबतचा अर्ज भरावा. दिलेला QR CODE स्कॅन अर्जदाराने कशाप्रकारे अर्ज करावा याबाबतची प्रक्रिया सोबतच्या सादरीकरणात दिलेली आहे. बाडेन वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट चालक वाहन संघटना तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांना अवगत करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत उमेदवारास जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. तथापि जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार असून संदर्भाकित शासन निर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवाराचा सर्व खर्च हा शासन करणार आहे. जर्मनी व भारत या दोन्ही देशातील वाहनचालकांकरीता असलेले नियम व अभ्यासक्रम तसेच इतर अनुषंगिक यामध्ये तफावत असून उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबतची कार्यवाही व खर्च देखील शासनस्तरावरुन होणार आहे.

सातारा जिल्ह्यामधील सर्व ट्रान्सपोर्ट वाहनचालक संघटना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना व इतर वाहनचालकांना आवाहन करण्यात येते की, जर्मनी देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्यात सुरु असलेल्या नवनवीन प्रकल्पांतर्गत जर्मनीस जाण्यास इच्छुक असणाऱ्या वाहन चालकांनी अर्ज करावयाच्या प्रक्रियेबाबत QR CODE वर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या अटींप्रमाणे अर्ज भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट चालक वाहन संघटना व मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना यांनी बाडेन बुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत प्रसिद्धी व प्रसार करण्यासाठी सहकार्य करावे, अधिक माहितीसाठी आणि या योजनेचा लाभ घेण्याकरीता खालील QR CODE स्कॅन करणे, असे आवाहन करण्यात येत आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close