विद्यमान आमदार जुनीच कामे किती दिवस सांगत बसणार – डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सवाल – changbhalanews
राजकिय

विद्यमान आमदार जुनीच कामे किती दिवस सांगत बसणार – डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सवाल

येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोलीत मतदारांशी संवाद

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विद्यमान आमदार गेल्या दहा वर्षातीलच कामे पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला नाही. भूकंप संशोधन केंद्र उभारले ज्यावेळी उभारले त्यावेळी लोकांनी त्यांनाच दिली होती मते! मग अजून जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसता आहात?, अशी टीका डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, वीरवाडी व म्हासोली याठिकाणी आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी सवादेचे माजी सरपंच संजय शेवाळे, पंकज पाटील, येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, दिनकर पाटील, आण्णासो शेवाळे, पंजाबराव चोरगे, भास्कर शेवाळे, पै. अण्णा पाटील, अनिल वीर, पोपट शेवाळे, शेळकेवाडीच्या सरपंच सुनंदा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महायुती सरकारने आपल्या भागाला मोठ्याप्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे आपल्याला भाजपा महायुतीच्या सरकारच्या पाठीशी उभा राहायचं आहे. येत्या काळातही येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली आणि या परिसरात असणाऱ्या सर्व गावांच्या व वाड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

निवडणुकीत आता प्रचाराला कमी अवधी राहिला असून, आपण भाजपा महायुतीच्या सरकारने केलेल्या योजनांची व विकासकामांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली पाहोचवा. कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी येत्या २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून, मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

येवती येथे येवती, शेवाळेवाडी, घराळवाडी, दुधडेवाडी, काटेकरवाडी, काजारवाडी, हणमंतवाडी या गावातील मतदारांची बैठक डॉ अतुलबाबा भोसले यांनी घेतली. यावेळी येवती येथे संजय शेवाळे, सागर शेवाळे, पाटीलवाडी येथे सुभाष पाटील, वीरवाडी येथे परशुराम वीर, म्हासोली येथे दिनकर पाटील, सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी येवतीचे माजी सरपंच सागर शेवाळे, महादेव शेवाळे, जगन्नाथ शेवाळे, मारुती शेवाळे, दादासो शेवाळे, शिवाजी शेवाळे, मारूती देसाई, बाजीराव देसाई, संजय बोरगांवकर, मुंकु़द शेवाळे, रत्नापा कुंभार, पोपट शेवाळे, सुरेश मोहिते, जगन्नाथ घराळ, विलास शेवाळे, प्रदिप सोनवणे, सचिन जाधव, नितीन मोरे, राजेंद्र सोरटे, रमेश लोखंडे उपस्थित होते. येवती येथे संदीप शेवाळे, गणेश शेवाळे, महेश शेवाळे, काशीनाथ सोरटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पाटीलवाडी येथे प्रकाश पाटील, उत्तम पाटील, भानुदास पाटील, जगन्नाथ पाटील, अंकुश पाटील, शिवाजी पाटील, शंकर साठे, सिद्रम पाटील, महादेव शेवाळे, अभय पाटील, शंकर वीर, नितीन हिनुकले, विजय बाबर, माजी सरपंच सुभाष पाटील, प्रकाश पाटील, हणमंत पाटील, सुनिल पाटील, उत्तम पाटील, अनिल पाटील, बाळासो पाटील, मधुकर पाटील, महादेव शेवाळे, मोहन पाटील, बबन पाटील, डॉ. संजय पाटील, भास्करराव शेवाळे, वीरवाडी येथे परशुराम वीर, अनिल वीर, पोपट घराळ, रामचंद्र घराळ,तानाजी वीर, बबन हिनुकले, हणमंत पाटील, सुभाष पाटील पै. आण्णा पाटील, म्हासोली येथे व्हा.चेअरमन उदय पाटील, दिनकर पाटील, संतोष सुर्यवंशी, अशोक धनवडे, दत्तात्रय शेवाळे, संजय शेटे,धनाजी मोहिते,भानुदास शेटे, सुखदेव बापू, आण्णासो शेवाळे, पांडुरंग माने, आण्णा पाटील,गंगाराम चोरगे, बजरंग पाटील, राजाराम पाटील, अनिल सुर्यवंशी, पोपट पवार, महादेव पवार, वैभव चोरगे आदी उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close