कराडला शिवसेनेच्यावतीने रुग्णांना फळे वाटप – changbhalanews
Uncategorized

कराडला शिवसेनेच्यावतीने रुग्णांना फळे वाटप

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी व पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व पालकमंत्री ना शंभूराजे देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड शहर शिवसेनेच्यावतीने येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आज शुक्रवारी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. विविध वार्डमध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी याचा स्वीकार केला.

 

यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने म्हणाले, वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आम्हा तमाम शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांना कृतिशील अभिवादन म्हणून आम्ही कराड शहर शिवसेनेच्यावतीने स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी फळे वाटप केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून आम्ही पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांनाही कृतिशील शुभेच्छा देत आहोत.

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे कराड शहर शिवसेनेच्यावतीने शहराध्यक्ष राजेंद्र माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज, शुक्रवारी सकाळी विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. दोन्ही कार्यक्रमांसाठी कराड शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने,
उपशहरप्रमुख राजू खराडे, गणेश भोसले, संदीप थोरवडे,
शाखाप्रमुख संकल्प मुळे, अजित भोसले, आयाज मुल्ला, प्रदीप घारे, सुरज गुरखा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close