कराडच्या ‌‘संजीवन‌’मध्ये शॉक व्हेव बलुन लिथोट्रिप्सीद्वारे हृदय उपचार यशस्वी – changbhalanews
Uncategorized

कराडच्या ‌‘संजीवन‌’मध्ये शॉक व्हेव बलुन लिथोट्रिप्सीद्वारे हृदय उपचार यशस्वी

अत्याधुनिक तंत्रज्ञाने टळली बायपास शस्त्रक्रिया ः डॉ. विजयसिंह पाटील यांच्यासह टीमचे कौतुक

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
हृदयाशी संबंधीत अत्यंत किचकट शस्त्रक्रिया डॉ. विजयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात यशस्वी पार पडत आहेत. डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टावीसारखी क्लिष्ट शस्त्रक्रियाही यशस्वी झाली आहे. विशेषतः कॅल्शियमयुक्त ब्लॉकेज असतील अशावेळी एन्जीओप्लास्टी तसेच बायपास शस्त्रक्रिया करणे किंवा शारिरीक सक्षम नसणाऱ्या रुग्णांवर शस्त्रकिया करणे अवघड असेल अशावेळी शॉक व्हेव थेरपीचा वापर करण्यात येतो. नुकतीच संजीवन मेडिकल सेंटरमध्ये  वयोवृध्द रुग्णावर शॉक व्हेव थेरपी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. बायपास शस्त्रक्रिया टाळण्यासाठी ही उपचारपध्दती उपयुक्त आणि सुरक्षित असल्याची माहिती संजीवन मेडिकल सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विजयसिंह पाटील यांनी दिली.

डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये असलेल्या अतिरिक्त कॅल्शिअममुळे हृदयविकार शस्त्रक्रियांमध्ये स्टेन्ट टाकूनही रुग्णाला लाभ होत नाही. त्यामुळे हृदयरक्तवाहिन्यांमध्ये साठलेले कॅल्शिअम काढून टाकण्यासाठी आता शॉकव्हेव थेरपी (शॉकव्हेव इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी) विकसित करण्यात आली आहे.  जगभरामध्ये आता वापरात आलेली ही थेरपी संजीवन मेडिकल सेंटरमध्ये  पहिल्यांदा वापरण्यात आली आहे. संबंधीत वयोवृध्द रुग्णाच्या छातीमध्ये वेदना होत होत्या. थोडीजरी हालचाल केली तरी दम लागत होता. या व्याधीवर त्यांनी अनेक रुग्णांलयातून सल्ले घेतले यावेळी त्यांना बायपास करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र संबंधीत रुग्णांवर आपल्या सेंटरमध्ये शॉक व्हेव थेरपी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. सद्या संबंधीत रुग्णास डिसचार्ज देण्यात आला आहे. याचबरोबर यापूव दोन दिवसांच्या बालकावर हृदयशस्त्रक्रिया यशस्वी केली असून वयावृध्द रुग्णावर टावीही हृदयाशी संबंधीत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. यासह अनेक अत्यंत गुंतागुंतीच्या व किचकट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. राजाराम पाटील म्हणाले, संजीवन मेडिकल सेंटर मध्ये हृदयविकार, किडनी विकार, मेंदू विकार, स्त्री रोग, मधुमेह, हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार यासह सर्व प्रकारच्या व्याधींवर उपचार केले जातात. जागतिक दर्जाची उपकरणे अद्ययावत इन्फेकश्न कंट्रोल प्रणाली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर   व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार केले जातात. याचबरोबर कुशल नर्सिंग स्टाफ व रुग्णांशी आपुलकीच्या भावनेने राहणारा कर्मचारी वर्ग आहे. तसेच गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा लाभही अनेक गरजू आर्थिक दुर्बल रुग्णांना मिळवून देण्यात येत आहे.

डॉ. विजयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुलतज्ज्ञ डॉ. सुहास पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. योगिता पाटील, डॉ. दिलीप सोळंकी, डॉ. समृध्दी पाटील, स्वप्नील साळुंखे, अमित चोपडे, धनश्री पाटील यांच्यासह सर्व टीमने संबंधीत वयोवृध्द रुग्णांवर शॉक व्हेव थेरपी यशस्वीपणे पार पाडली असून उपचार घेऊन ते सुखरुप घरी परतले आहेत. याबद्दल संजीवन मेडिकल सेंटरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कूलर बलून लिथोट्रिप्सी ही अमेरिकन अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. या पद्धतीत बलूनमध्ये असणाऱ्या एमीटरच्या माध्यमातून अल्ट्रा हाय प्रेशर सॉनिक वेव्हस हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांतील कठीण अशा कॅल्शियमच्या ब्लॉकला दिल्या जातात. त्यामुळे कॅल्शियम फुटण्यास मदत होते व धमन्यांचा आकार मोठा करता येतो. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होऊन स्टेंट टाकण्यास मदत होते.  
– डॉ. विजयसिंह पाटील, मेडिकल डायरेक्टर, संजीवन मेडिकल सेंटर, कराड
 
संजीवन मेडिकल सेंटरमध्ये 187 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ ः रामहरी राऊत

महाराष्ट्र राज्य शिवसेना वैद्यकीय कक्ष मदतप्रमुख रामहरी राऊत यांनी नुकतीच संजीवन मेडिकल सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. कोणतीही वशिलेबाजी न वापरता गोरगरिब तब्बल 187 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवून देण्यात आला असून ही योजना अत्यंत यशस्वी प्रभावीपणे या सेंटरमध्ये राबविली जात असल्याबद्दल डॉ. विजयसिंह पाटील यांचे व त्यांच्या टीमचे त्यांनी कौतुक केले. याचबरोबर यामध्ये  रुग्णालयातील  स्वच्छता व रुग्णांशी कर्मचाऱ्यांचे असलेले वर्तन याबद्दल समाधान व्यक्त केले. तरी आर्थिक दुर्बल व गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. दिलीप सोळंकी यांनी केले आहे. 

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close