कराड येथे 4 ते 9 फेब्रुवारीला भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री कबड्डी चषकाचे आयोजन – changbhalanews
मैदान

कराड येथे 4 ते 9 फेब्रुवारीला भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री कबड्डी चषकाचे आयोजन

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कराड येथे भव्य राज्यस्तरीय कबड़ी स्पर्धा दिनांक 4 ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली असून पुरुष व्यावसायिक गट, मुख्यमंत्री चषक 2024, महिला खुला गट, 35 किलो वन डे आणि 70 किलो वन डे असे कबड्डीचे रंगतदार सामने होणार आहेत. अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणियार, सचिव रमेश जाधव यांनी दिली.

कबड्डी स्पर्धेचे संयोजक लिबर्टी मजदूर मंडळ, रणजीत पाटील (नाना) यांनी केलेले आहे. पुरुष व्यावसायिक गट बक्षिसे प्रवेश फी रु. 1000/- दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2024. प्रथम क्रमांक – रु २,२२,२२२/- व चषक, द्वितीय क्रमांक – रु १,११,१११/- व चषक तृतीय क्रमांक – रु ५५,५५५/- व चषक, चतुर्थ क्रमांक – रु ५५,५५५/- व चषक, अष्टपैलू खेळाडू – रु ५,५५५/- व चषक, उत्कृष्ट चढाई – रु ३,३३३/- व चषक, उत्कृष्ट पकड – रु ३,३३३/- व चषक‌.

महिला खुला गट बक्षिसे एक दिवसीय, प्रवेश फी रु. 500/- दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2024, प्रथम क्रमांक – रु १,११,१११/- व चषक, द्वितीय क्रमांक – रु ५५,५५५/- व चषक, तृतीय क्रमांक – रु ३३,३३३/- व चषक, चतुर्थ क्रमांक रु ३३,३३३/- व चषक, अष्टपैलू खेळाडू रु ३,३३३/- व चषक, उत्कृष्ट चढाई – रु २,२२२/- व चषक, उत्कृष्ट पकड – रु २,२२२/- व चषक.

35 किलो गट बक्षिसे एक दिवसीय – प्रवेश शुल्क फी रू. 250/- दिनांक 4 ते 5 फेब्रुवारी 2024, प्रथम क्रमांक – रु १५,५५५/- व चषक, द्वितीय क्रमांक – रु ११,१११/- व चषक, तिसरा क्रमांक – रु 7,777/- आणि चषक, अष्टपैलू खेळाडू – रु १,१११/- व चषक, उत्कृष्ट चढाई – रु ७७७/- व चषक, उत्कृष्ट पकड – रु ७७७/- व चषक.

70 किलो गट बक्षिसे एक दिवसीय – प्रवेश शुल्क रु. ३५०/- दिनांक 5 ते 6 फेब्रुवारी 2024, प्रथम क्रमांक रु २५,५५५/- व चषक, दुसरा क्रमांक रु १५,५५५/- व चषक, क्रमांक तीन रु ११,१११/- व चषक, अष्टपैलू खेळाडू रु १,५५५/- व चषक, उत्कृष्ट चढाई रू. १,१११/- व चषक, उत्कृष्ट पकड – रु ७७७/- व चषक. विजेत्या संघाना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून व्यक्तिगत अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आदी विविध बक्षीसे देण्यात येणार आहेत.

लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कबड्डी संघ सहभागी होणार आहेत. तसेच कबड्डी प्रो मध्ये सहभागी झालेले खेळाडू स्पर्धे दरम्यान हजेरी लावणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

 या नामांकित संघांचा सहभाग…..

B.P.T. मुंबई, बी. P.C.L, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँक, हिंदुजा हॉस्पिटल, जे. जे. रुग्णालय, न्यू इंडिया इन्शुरन्स, मुंबई महानगरपालिका, इन्कम टॅक्स पुणे, ठाणे महानगरपालिका – ठाणे, सोपान काका मागे, सासवड, BHDLINE, रायगड या ठिकाणचे व्यावसायिक कबड्डी संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत.

हे नामांकित खेळाडू उपस्थित राहणार

१. रेखा सावंत – शिव छत्रपती पुरस्कार- राजमाता जिजाऊ पुणे,
२ अपेक्षा टाकळे- शिव छत्रपती पुरस्कार – शिवशक्ती मुंबई,
३ आम्रपाली गलांडे -राष्ट्रीय खेळाडू – प्रकाश तात्या बालवडकर,
४ सायली केरीपाळे, मंदिरा कोमकर राष्ट्रीय खेळाडू – राजमाता जिजाऊ पुणे
५ अंकिता चव्हाण – राष्ट्रीय खेळाडू – प्रकाश तात्या बालवडकर
६ साक्षी गावडे – राष्टीय खेळाडू बारामती स्पोर्ट्स अकॅडेमी
७ निलेश शिंदे – शिवरात्री पुरस्कार, प्रो कबड्डी, भारत पेट्रोलियम
८ रिशांक देवाडीगा – शिवछत्रपती पुरस्कार, प्रो कबड्डी – भारत पेट्रोलियम
९ सुनील दुबिले- प्रो कबड्डी, मुंबई कस्टम,
१० अजिंक्य पवार, सौरभ कुलकर्णी, राष्टीय खेळाडू – पोस्टल मुंबई

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close