गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत कराडला मंगळवारी भव्य राष्ट्रीय महासत्संग – changbhalanews
आपली संस्कृती

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत कराडला मंगळवारी भव्य राष्ट्रीय महासत्संग

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सातारा जिल्हा आयोजित आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, अष्टसिद्धी महाशक्तीपिठाचे पिठाधीश आणि दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे भव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार दिनांक १४ मे रोजी दुपारी ४ वाजता वाखाण रोड कराड येथे संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दि.१४ मे रोजी वाखाण रोड कराड येथे महासत्संग सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या महासत्संग मेळाव्यात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मध्ये विवाह संस्कार विभागांतर्गत सर्व धर्मीय वधुवर परिचय मेळावा आयोजित केला आहे.

तसेच विविध आजारांवर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली सदगुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हाँस्पिटल अँड मेडिकल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व नाडी परिक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परमपूज्य गुरूमाऊलींच्या सानिध्यात आर्थिक प्राप्तीची अति उच्च सेवा श्री सुक्त पठण १६ वेळा होणार असून सायंकाळी ४ वाजता परमपूज्य गुरूमाऊलींचे प्रासादिक अमृततुल्य हितगुजातून संवाद साधणार आहेत. कृषी शास्त्र, आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, बालसंस्कार, युवा प्रबोधन, गर्भसंस्कार, मानवाच्या विविध समस्या, गुरूप्रणाली अंतर्गत ग्राम अभियान, स्वयंरोजगार, शेतीसाठी आधुनिक तंत्र, शेतीचे वास्तुशास्त्र ह्या मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवर परमपूज्य गुरूमाऊली प्रबोधनात्मक हितगुज साधणार आहेत.

या मेळाव्यामध्ये सकाळी ११:०० पासून खाली नमूद केलेले विभाग विनामुल्य मार्गदर्शन करणार आहेत. बालसंस्कार विभाग बालमनावर सुसंस्कार रुजवणे त्यांना नैतिक व चारित्र्याचे संवर्धन तसेच विद्यार्थी सर्वगुण संपन्न घडवणे या विषयी मार्गदर्शन. कृषी विभाग रासायनिक खताचा वापर न करता कमीत कमी खर्चात शेतीचे उत्पन्न वाढवणे, संद्रीय शेती, सात्विक शेती, शेतीचे वास्तुशास्र याविषयी सखोल मार्गदर्शन.आरोग्य व आयुर्वेद विभाग आरोग्य शिबीर, नाडी परीक्षण, विनामुल्य आरोग्य तपासणी व आयुर्वेद औषध भांडार.भारतीय संस्कृती ,मराठी अस्मिता विभाग वर्षभरातील सण,वार, व्रतवैकल्ये या विषयी मांडणी आणि मार्गदर्शन.प्रश्नोत्तर विभाग मानवी समस्या, विवाह, आरोग्य, नोकरी, कोर्ट कचेरी, आर्थिक यासर्व समस्या वर मार्गदर्शन. वास्तूशात्र विभाग योग्य व अयोग्य वास्तू याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विवाह संस्कार विभाग उपवर मुला मुलींची नोंदणी व विवाह संस्कार या विषयी मार्गदर्शन.युवा प्रबोधन विभाग युवकांना करिअर गाईडन्स, व्यसनमुक्त, राष्ट्र आणि आपली कर्तव्य या विषयी मार्गदर्शन.गर्भसंस्कार व पालकत्व विभाग गर्भस्थ बालकावर संस्कार अर्थात गर्भसंस्कार व पालक या विषयी मार्गदर्शन.पारंपारिक वस्तू प्रदर्शन पारंपारिक पूर्वा पार वस्तूंचे प्रदर्शन.पर्यावरण, कायदेविषयक विभाग ,स्वयंरोजगार, वेद विज्ञान, प्रशिक्षण, पशु व गौवंश, माहिती तंत्रज्ञान,देश विदेश अभियान व प्रशासकीय विभाग या विषयी विनामुल्य मार्गदर्शन असणार आहे.

या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून सेवेकरी भाविक उपस्थित राहणार आहेत. गुरुमाऊलींच्या हितगुजाव्दारे कृपाशिर्वाद घेऊन आपले जीवनज्ञसुखमय कण्यासाठी आपण व आपल्या कुटुंबासह उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close