शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी : पीएम किसान योजनेचा हप्ता जूनमध्येच मिळणार – changbhalanews
शेतीवाडी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी : पीएम किसान योजनेचा हप्ता जूनमध्येच मिळणार

मुंबई, (दि. 18 जून 2025) | चांगभलं वृत्तसेवा
🌾 शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. या योजनेत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण ६००० रुपये शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य स्वरूपात दिले जातात.

या महिन्यातील हप्ता २० जून रोजी जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. योजना प्रशासनामार्फत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले आणि पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करणारे शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना असून, देशभरातील करोडो शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित खर्चासाठी आर्थिक आधार मिळतो.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close