चांगभलं ऑनलाइन | मुंबई
गेल्या काही दिवसांतील चढ उतारानंतर सोने-चांदीच्या दराने आज पुन्हा उसळी घेतलीय. दरम्यान, दसरा दिवाळी तोंडावर असताना सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.
आज १९ ऑक्टोबरपर्यंत रोजी सोन्याचा सरासरी १० ग्रॅमचा भाव ६०,००० रुपये आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ६०,५०० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५, ४६० रुपये आहे. चांदीची प्रतिकिलो किंमत ७४,६०० रुपये आहे.
युद्धामुळे अशांतता सुरू असल्याने सुरक्षित मालमत्तेची मागणी वाढली आहे. त्याचाही परिणाम जाणवत आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, क्रूडच्या किमतीत झालेली वाढ आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात ५०० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. तर, चांदीमध्येही एक हजार रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे.