शाम गावच्या शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी तातडीने सोडा – changbhalanews
शेतीवाडी

शाम गावच्या शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी तातडीने सोडा

अन्यथा तीव्र आंदोलन करू : सचिन नलावडेंचा इशारा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोम्बाळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइन द्वारे दिडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिता खाली येत असते, परंतु टेंभू योजनेचे पाणी बोबळवाड़ी तलावत सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे , त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला गेले महीना भर पाणी देता आले नाही तसेच शामगावचे पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न गंभीर झाला आहे

या प्रश्नावर आज शामगाव ग्रामस्थ व रयत क्रांति संघटनेच्यावतीने टेंभू धरण व सिंचन व्यवस्थपन विभाग ओगलेवाडी यांना निवेदन देवून येत्या तीन चार दिवसात पाणी सोडावे अशी मागणी केली.
यावेळी टेंभूचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता नरवड़े यांनी येत्या चार दिवसात पाणी सोडण्याचे मान्य केले. तसेच यावेळी सर्व शेतकऱ्यांनी टेंभू व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार पाणी मागणी अर्ज केला आहे.

शामगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन महिन्या पूर्वी टेंभू योजनेचे पाणी शामगावला पाईपलाइनद्वारे कायम स्वरूपी मिळावे यासाठी पाच दिवस शामगाव येथे उपोषण केले होते. भविष्यात या योजनेला मंजूरी मिळून पाणीही मिळेल पण आता ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुण बोबळवाड़ी तलावातून पाइपलाइन केली आहे त्यांची पीके पाणीविण्या वाळत चालली आहेत

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close