Uncategorized
माजी आमदार आनंदराव पाटील यांचा उद्या वाढदिवस

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा उद्या (१९ फेब्रुवारी) रोजी जन्मदिन आहे . सातारा जिल्ह्यात नानांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यामध्ये मोठे योगदान आहे. सोमवार दि. १९ रोजी त्यांचा वाढदिवस असून दरवर्षीं विविध कार्यक्रमांनी हा वाढदिवस साजरा केला जातो. परंतु पूर्वनियोजित दौऱ्यामुळे यंदा सोमवारी दि. १९ रोजी नाना बाहेरगावी आसल्याने या वर्षी त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार नाही.
माजी आ. आनंदराव पाटील (नाना) हे परगावी असल्या कारणाने शुभेच्छा स्विकारण्यासाठी कराड येथील त्यांच्या निवास्थानी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे वाढदिवशी त्यांची भेट होऊ शकणार नाही , याची सर्व कार्यकर्ते, मित्र मंडळी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ‘माजी आ. आनंदराव पाटील (नाना) वाढदिवस समिती कराड’ यांच्यावतीने करण्यात आले आहे.