माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत कराड तालुक्यातील 52 गावांमध्ये 5 कोटींचा भरघोस निधी मंजूर झाला असून या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. यामध्ये कराड दक्षिण साठी 3 कोटी 87 लाख रुपयांचा तर कराड उत्तर साठी 1 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये विविध विकासकामांसाठी 3 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यामध्ये विंग येथील विंग पासून शिंदेवाडीकडे घोरपडे वस्तीतून जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. 15 लाख, किरपे येथील एस. टी. स्टँड ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, सैदापूर येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, खोडशी येथील निनाई मंदिर ते कृष्णा डेअरी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, वारुंजी येथील नामदेव काशिनाथ पाटील यांचे घर ते गावविहीरी पर्यंत आर.सी.सी. गटर करणेसाठी रु. 15 लाख, येरवळे येथील बाबुराव राजाराम यादव यांचे घरापासून तसेच मुख्य रस्त्यापासून थोरात आळी, पाणसकर आळी, देसाई आळी ते दिलिप सहदेव यादव यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 10 लाख, घोगांव येथे रा. मा. 144 ते जाधववाडीला जाणारा रस्ता डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, टाळगांव येथे वसंत भाटे यांच्या घरापासून ते नामदेव पाटील यांच्या शेडापर्यंत रस्ता डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, वनवासमाची येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 5 लाख, चचेगांव येथील सचिन पांडूरंग पवार यांच्या घरापासून ते निलेश मोहन पवार यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व गटर बांधणेसाठी रु. 10 लाख, येणके येथील मुस्लिम समाजाची दफनभूमी व संरक्षकभिंत बांधणेसाठी रु. 15 लाख, शेळकेवाडी (म्हासोली) येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे रु. 15 लाख, गोवारे येथील कृष्णा कॅनाल वरील रस्ता गावारे हद्दीतील रस्ता डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, कोळेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणेसाठी रु. 7 लाख, वडगाव हवेली येथे बापूराव गुंडा जगताप यांच्या घरापासून ते कार्वे शिव रस्ता बंदिस्त गटर बांधणेसाठी रु. 10 लाख, कार्वे येथील गोपाळनगर येथे सामाजिक सभागृह बांधणेसाठी रु. 10 लाख, बामणवाडी, ता. कराड येथील वानरवाडी कुसूर रस्ता ते भगवान तोडकर यांच्या घरापासून ते ओढ्यापर्यंत आर. सी. सी. गटर बांधणेसाठी रु. 7 लाख, ओंडोशी येथे ग्रामपंचायत कार्यालय पासून ते गाव विहीरीपर्यंत व प्रकाश शिंदे घर ते विजय गुरव यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 7 लाख, मालखेड येथील श्रीकांत चरणकर यांच्या घरापासून ते पंकज बुरंगे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 10 लाख, शिंगणवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधणेसाठी रु. 15 लाख, गोळेश्वर येथील गोदावरी कॉलनी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, कापील येथील सात सईद मळा येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 7 लाख, महारुगडेवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 7 लाख, ओंड येथे भगवा कट्टा ते नितीन स्टील वर्क्स पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस बंदिस्त गटर करणेसाठी रु. 7 लाख, गोंदी येथे फरशी ते कॅनॉल पाणंद रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणेसाठी रु. 7 लाख, काले येथे काले-मालखेड देसाई वस्तीतील ग्रा. मा. 239 रस्ता मुरमीकरण व खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, नायकुडवाडी (सवादे) येथील मेन रोड ते आडापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणेसाठी रु. 10 लाख, गोटेवाडी येथील काटेकर वार्डमध्ये आर. सी. सी. गटर करणेसाठी रु. 5 लाख, वाठार येथील भिमराव देसाई यांच्या घरापासून ते हनूमान मंदिर पर्यंत (300 मी.) आर. सी. सी. गटर करणेसाठी रु. 10 लाख, घराळवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 5 लाख, शेळकेवाडी (येवती) येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 5 लाख, येणपे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, काले येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे रु. 10 लाख, ओंड येथील मारुती मंदिरापासून ते मेन रोडकडे येणारा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख,
बेलवडे बु. येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 09 लाख, तुळसण येथील सुतार गल्ली ते जुने ग्रामपंचायत कार्यालय पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, विठ्ठलवाडी येथील मागासवर्गीय वस्तीतील गणपत नाना चव्हाण यांच्या घरापासून ते दिपक दत्तू चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणेसाठीसाठी रु. 10 लाख, पाचुपतेवाडी येथील किसन दत्तू मोरे यांच्या घरापासून ते निवास शंकर मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व गटर करणेसाठी रु. 5 लाख, सवादे येथील हनुमान सांस्कृतिक भवनाच्या शेजारील ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये खुले सभागृह बांधणेसाठी रु. 10 लाख, लटकेवाडी येथील नाथा पाटील इंटर नॅशनल स्कूल ते महोदव मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 07 लाख, म्हासोली येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 7 लाख, हवेलवाडी येथील पिकअप शेड बांधणेसाठी रु. 5 लाख असा एकूण 3 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामधून कराड दक्षिणमधील मंजूर गावांमध्ये विकासकामे केली जाणार आहेत.