रेकॉडवरील तडीपार गुंडास पिस्तूल व जिवंत काडतुसासह सापळा रचून अटक ; कराड पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाची कारवाई – changbhalanews
क्राइम

रेकॉडवरील तडीपार गुंडास पिस्तूल व जिवंत काडतुसासह सापळा रचून अटक ; कराड पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाची कारवाई

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा-सांगली जिल्ह्यातून तडीपार असतानाही त्याचे उल्लंघन करून कराड परिसरात वावरत असलेल्या गुंडाला सापळा रचून कराड पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने त्याच्याकडील पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक केली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने आत्तापर्यंत तब्बल 91 पिस्तुले जप्त केली आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हयामध्ये गुन्हेगार व त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सक्त सुचना केल्या आहेत. सातत्याने ठोस पावले उचचली आहेत. सातारा जिल्हयातील गुन्हेगारी नियंत्रणाकरीता अवैध शस्त्र खरेदी-विक्री व बाळगणाऱ्यांविरुध्द विशेष मोहिम सुरुवातीपासुन राबविली आहे. दि.२३ जुलै २०२४ रोजी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर , यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ मध्ये हद्दपार असलेला अभिलेखावरील गुन्हेगार इसम नामे निशिकांत निवास शिंदे रा. रेठरेकर कॉलनी कराड हा त्याचे राहते घरी येणार असुन, तो त्याचेसोबत पिस्तूल बाळगुन असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर बातमीप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकअमित बाबर यांना इतर अंमलदार यांना सोबत घेवुन सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेश दिला. त्याप्रमाणे पोलीस पथकाने संशयीताचे घराचे दुतर्फा सापळा रचून व दबा धरुन अभिलेखावरील व तडीपार असलेला गुन्हेगार निशिकांत निवास शिंदे रा. रेठरेकर कॉलनी कराड यास देशी बनवाटीचे पिस्तूल (किंमत अंदाजे रु.७५०००/- ) व दोन जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे रु.१२००) व मोबाईल फोन (किंमत अंदाजे रु.१००००/-) यासह ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयित निशिकांत शिंदे याला संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हयाचे शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी तालुक्यांचे हददीतुन दोन वर्षांकरीता हददपार करण्यात आले होते. संशयिताविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोउनि देवकर हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ९१ पिस्तुले जप्त…

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यापासुन अनेक बेकायदेशीर अग्निशस्त्रे (पिस्टल) बाळगणाऱ्या तसेच विक्री करण्याऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने ९१ देशी बनवाटीचे पिस्टल, ३ बारा बोअर, १ रायफल, २०१ जिवंत काडतुसे, ३८५ रिकाम्या पुंगळया, १ रिकामे मॅग्झिन असे जप्त करुन संबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाई केली आहे.

कराड पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक…
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांनी सदरची कारवाई केली. सदर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व पथकातील अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close