मराठा आरक्षणासाठी लोणंद येथे उपोषण; विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून पाठिंबा
लोणंद प्रतिनिधी | गणेश भंडलकर
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात ठिकठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलने चालू आहेत. याच पार्श्वभुमीवर लोणंद व परिसरातील मराठा समाजाच्या वतीने आज साखळी उपोषण करण्यात आले.
आज दिनांक ०२ रोजी नगरपंचायत समोर लोणंद आणि परिसरातील मराठा समाजाने एकत्र येत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय उपोषण केले. यावेळेस छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा समाज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शुभम दरेकर व महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस लोणंद शहर व परिसरातून मोठ्या संख्येत मराठा भगिनी व बांधव उपस्थीत होते.
सकाळपासूनच विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने उपोषण स्थळी भेट देत मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा दर्शविण्यात येत होता. यामधे लोणंद येथील मुस्लिम समाज, नाभिक समाज, खंडाळा तालुका आरपीआय आठवले गट, वीरशैव लिंगायत समाज, खंडाळा तालुका संभाजी ब्रिगेड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा देण्यात आला.
यावेळेस यावेळी डॉ नितीन सावंत, मराठा समाज अध्यक्ष शुभम दरेकर, दयानंद खरात, उपनगराध्यक्ष रविंद्र क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती सुनिल शेळके, हर्षवर्धन शेळके , विनोद क्षीरसागर, सुनिल यादव, राहुल घाडगे, कय्युम मुल्ला, राजु इनामदार, जावेद पटेल, ॲड. वैभव धायगुडे आदींनी मनोगत व्यक्त केले .
उपोषण स्थळी नगराध्यक्षा सीमा खरात, डॉक्टर अनिलराजे निंबाळकर, लोणंद नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, राजेश शिंदे, संजय मोकाशी, राजुशेठ डोईफोडे, कपिल जाधव, रविकांत भोसले, शंभूराज भोसले, हणमंतराव शेळके , ॲड. विलायत मणेर, डॉक्टर उमेश साळुंखे, ॲड. गणेश शेळके , आजमभाई आत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणंद शहरातून काढला कॅन्डल मार्च.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोणंद शहरातून संध्याकाळच्या वेळेस कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅन्डल मार्च नगरपंचायत पटांगणापासून शास्त्री चौक, गांधी चौक , जुनी पेठ , लक्ष्मीरोड मार्गे पुन्हा नगरपंचायत पटांगणावर आला. मोर्चादरम्यान “एक मराठा, लाख मराठा ” अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामधे मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती. मोर्चाच्या वेळेस लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.