मराठा आरक्षणासाठी ऊद्या लोणंद येथे उपोषण व कॅन्डल मार्च – changbhalanews
Uncategorizedराजकियराज्य

मराठा आरक्षणासाठी ऊद्या लोणंद येथे उपोषण व कॅन्डल मार्च

सरकार मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत बघ्याच्या भूमिकेत - सुनिल यादव

लोणंद प्रतिनिधी | गणेश भंडलकर

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यातून आंदोलन केले जात आहे.

मराठा समाजाच्या तीव्र भावना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येऊ लागलेल्या आहेत.परंतु सरकार मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही.नुसती बघ्याची भूमिका पार पाडत असून हे सरकार मूग गिळून बसलेले आहे.आजही अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आहेत.तरीही ह्या सरकारला पाझर फुटेना झालेला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला पाझर फुटणार आहे की नाही? असा सवाल लोणंद येथील युवा नेते सुनिल यादव यांनी सकल मराठा समाज खंडाळा तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणा प्रसंगी उपस्थित केला आहे.

लोणंद ता.खंडाळा येथे सुद्धा दि.२ नोव्हेंबर रोजी उपोषण व कॅन्डल मार्च आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील यादव यांच्या कडून सुद्धा करण्यात आलेले आहे.

सुनील यादव म्हणाले की, आरक्षण आम्हाला मिळायला हवे.आरक्षण घेणे हा सुद्धा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला ही लवकरात लवकर हे आरक्षण देण्यात यावे. एका दिवसात पक्ष फुटतोय, पहाटेचा शपथविधी पार पडतोय तर इथल्या सरकारला एका दिवसात का आरक्षण मिळवून देता येत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आज आरक्षण नसल्याने शिक्षण घेणे अवघड झाले आहे. नोकऱ्या मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मराठा समाजातील मुलांची कुचंबना होउ लागलेली आहे. गुणवत्ता आणि टक्केवारी आहे. परंतु आरक्षण नसल्याने विद्यार्थी सोई सुविधांपासून वंचित राहत आहेत. ५८ मोर्चे काढून राज्यभर आरक्षणाचे वादळ निर्माण करण्यात आले. याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यात आले. आरक्षण मिळवून देण्यासाठी धडपड सुद्धा झाली. आरक्षण मिळण्याची घोषणा झाली. परंतु न्यायालयाच्या कसोटीवर हे आरक्षण टिकले नाही. आज ही आरक्षणाचा मुद्दा न सुटल्याने अखेर मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.
मराठा समाजाचे अजून किती बळी घेणार आहात ? असा सवाल सुद्धा सुनील यादव यांनी उपस्थित केला.

आमरण उपोषण, साखळी उपोषण, लाक्षणिक उपोषण आजही सुरू आहे. त्यामुळे आता तरी या आंदोलनाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मराठा समाजाला आता आरक्षण मिळालेच पाहिजे अशी तीव्र भावना मराठा समाजात असून या भावनेची कदर राज्यकर्त्यांनी करावी असे युवा नेते सुनील यादव यांनी म्हटले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close