अंगणवाडी सेविकांना मिळाले ‘हे’ अनोखे ट्रेनिंग – changbhalanews
Uncategorized

अंगणवाडी सेविकांना मिळाले ‘हे’ अनोखे ट्रेनिंग

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमने घेतला पुढाकार

चांगभलं ऑनलाइन | कराड
इनर व्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्यावतींने गृहिणी दिनाचे औचित्य साधून टीचर ट्रेनिग अंतर्गत ‘बालकांची मानसिकता ओळखून त्यांच्याशी शिक्षकांचे वर्तन कसे असावे’, या विषयी अनोखे प्रशिक्षण देण्यात आले

या प्रशिक्षणासाठी कृष्णा विद्यालयातील प्रो. डॉ. वैशाली राजे यांच्या व्याख्यानाचे आयोजन अंगणवाडी सेविकांसाठी करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजे यांनी सेविकांना उत्तम मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. यावेळी मसूर बिटाअंतर्गत समावेश असलेल्या कोपर्डे हवेली, हेळगाव विभागातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाला सुपरवायझर वंदना केंजळे, कुंभार मॅडम उपस्थित होत्या. तसेच क्लब प्रेसिडेंट तरुणा मोहिरे, सेक्रेटरी छाया पवार, माहेश्वरी जाधव, सारिका शहा, अंजना माने, पुष्पा चौधरी, वृषाली पाटणकर, दीपाली लोहार, सुषमा तिवारी, निमिषा गौर, सारिका वेल्हाळ उपस्तीत होत्या. यावेळी सर्व सेविकांना दिवाळी निमित्त भेटवस्तु क्लबच्यावतीने देण्यात आल्या. हा कार्यक्रम कोपर्डे हवेली येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉलमध्ये पार पडला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close