लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा
आरपीआयचे सुनील तोरणेंची मागणी ; खा. संजय काका पाटील आ. गोपीचंद पडळकर यांना निवेदन
चांगभलं ऑनलाइन | आटपाडी प्रतिनिधी
लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, यांसह इतर मागण्यांचे निवेदन आर पी आय (आठवले) कलाकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे यांनी खा. संजयकाका पाटील व आ. गोपीचंद पडळकर यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, लोककलावंतांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात यावे., कलाकार मानधन उत्पन्न अट ४८ हजार ऐवजी २ लाख करण्यात यावे., कलाकार मानधनासाठी ५० वर्षे वयाची अट रद्द करून ४० वर्षे करावी., जिल्ह्यासाठी दरवर्षी १०० कलाकारांना मानधन दिले जाते ती अट रद्द करून सर्व पात्र कलाकारांना मानधन सुरू करण्यात यावे, कलाकार मानधन प्रस्तावात सर्व कलाकारांचे १०० टक्के प्रस्ताव मंजूर करावेत, जिल्हयातील निवड कमिटी मध्ये सर्व तालुक्यातील सदस्य घेण्यात यावेत व निवड समितीमध्ये सर्व तालुक्यातील सदस्य असावेत, कलाकार मानधन मिळणेसाठी ज्या जाचक अटी लावल्या आहेत, त्या शिथील करण्यात याव्यात, कलाकार असलेला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल यांचा दाखला गृहीत धरावा, कलाकारांना आपले हक्काचे घरकुल मिळावे , अशा मागण्या यावेळी कलाकार संघटनेच्यावतीने सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.