कराडला मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपचे माजी नगरसेवक सुहास जगताप आणि नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सुहास जगताप यांच्या निवासस्थानी बुधवारी महिलांसाठी मोफत आयोजित केलेल्या ब्लड प्रेशर व शुगर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटन प्राध्यापक व्ही. के. कुलकर्णी सर, सौ. शीला कुलकर्णी मॅडम , योग गुरु वनमाला जोशी, सौ. मनीषा व संजय शेटे, महेंद्र कुलकर्णी, नंदकुमार ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरासाठी नागरी सुविधा केंद्राकडून शीला गुरव, मनाली जोशी, ललिता फल्ले, गायत्री कांबळे, आलिया कादरी या सर्वांचे सहकार्य झाले. या शिबिरामध्ये डेंगू , मलेरिया साथी बद्दल माहिती देण्यात आली तसेच गरोदर महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.