राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात ‘आरक्षणावर’ भर – changbhalanews
राजकिय

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात ‘आरक्षणावर’ भर

चांगभलं ऑनलाइन | पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज पुण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित झाला.

या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यानंतर जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन देण्यात आले असून आरक्षणासाठी असलेली 50% ची मर्यादा वाढवण्यात येईल, महिलांच्या आरक्षण 50 टक्के करण्यात येईल , आदीसह अन्य विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

युवक, महिला, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभुत सुविधा, नागरी विकास, लोकशाही मुल्यांचं जतन आदी मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जाहीरनाम्यातील लक्षवेधी आश्वासने अशी….

महीलांना विधानसभा लोकसभेत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार…

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग, हमीभाव, आयात निर्यात धोरण, कर्जमाफी याबाबत ठोस निर्णय घेणार…

शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालणार..

जातनिहाय जनगणेचा आग्रह धरणार…

आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा वाढवणार…

खासगी शैक्षणिक संस्थांमध्येही आरक्षण लागू करणार..

ज्येष्ठ नागरीकांसाठी आयोग स्थापन करणार…

अल्पसंख्यांकासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशिंची अंमलबजावणी करणार.‌..

शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतुद ६ टक्यांपर्यत करणार…

शेती आणि शैक्षणिक वस्तुंवर शुन्य टक्के जीएसटी ठेवणार..

अग्निवीर योजना रद्द करणार….

दरम्यान, गॅसच्या किमती निश्चित करण्याची, पेट्रोल डीझेलचे दर नियंत्रित करण्याची, शासकीय रिक्त जागा भरण्याचे , महिलांचे आरक्षण ५० टक्के करण्याचा आग्रह धरण्याचे,. जीएसटी मध्ये बदल करुन जीएसटी मध्ये राज्यांना अधिकार देण्याचे, अॅप्रेटीस विद्यार्थ्यांना ८५०० रुपये स्टायपेंड देण्याचे, स्पर्धा परीक्षाचे शुल्क माफ करण्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close