इमर्सनच्या आनंदा पाटील यांना राज्य शासनाचा विश्वकर्मा पुरस्कार प्रदान
चांगभलं ऑनलाइन | मुंबई
नांदगाव ता. कराड येथील आनंदा रघुनाथ पाटील यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आनंदा पाटील यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, आ. कालिदास कोळकर, कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळये यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. आनंदा पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेत मुंबई येथे हा पुरस्कार स्विकारला. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, २५००० रूपयेचा धनादेश, पदक तसेच प्रशस्तीपत्र असे आहे.
आनंदा पाटील हे इमर्सन क्लायमेंट टेक्नो इंडिया प्रा. लि. अतित, सातारा येथे ऑटोबाइंडिग ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी विविध संस्थांकडून गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदा पाटील यांचे नांदगाव ग्रामस्थांसह विविध संस्थाचे पदाधिकारी, इमर्सन कंपनी व्यवस्थापन, युनियन पदाधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.