दुबईला जाताना चोरट्याला विमानतळावर पकडला; महाबळेश्वर हॉटेल चोरी उघड!

सातारा, दि. ९ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
महाबळेश्वर येथील प्रसिद्ध हॉटेल ‘ऑक्सिजन’मधून लाखोंच्या वस्तू चोरी करून दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा व महाबळेश्वर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत तब्बल १७ लाख ९० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, २५ ते २८ जून २०२५ या कालावधीत हॉटेल ‘ऑक्सिजन’ मधून अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, भांडी आदी ९ लाख ९० हजार ८५० रुपयांचे साहित्य चोरी केले होते. यासंदर्भात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, तसेच हवालदार आणि पोलिसांनी कामगिरी केली. ६ जुलै रोजी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला संशयित आरोपी कांचन कालीप्रसाद बनर्जी (वय ५४, रा. जिजाई नगर, मोरेगाव नालासोपारा, वसई ईस्ट ) याला मुंबई विमानतळावर सहार पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील चौकशीत, चोरीचा मुद्देमाल साताऱ्यातील भंगार व्यावसायिकांकडे विकल्याचे समोर आले.
त्यानुसार संशयित आरोपी करण दशरथ घाडगे (वय २५, आंबवडे खुर्द, सातारा) व गौतम सुरेश जाधव ( वय २५, सैदापूर, सातारा) यांनाही अटक करण्यात आली. चोरीस गेलेले सर्व साहित्य व ८ लाख रुपये किमतीचे ट्रक व टेम्पो संशयिताकडून पोलिसांनी जप्त केले असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १७ लाख ९० हजार रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, बापूसाहेब सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, रुपाली काळे, रौफ इनामदार, विश्वास शिंगाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, प्रविण कांबळे, अविनाश चव्हाण, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमोल माने, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, राकेश खांडके, सनी आवटे, अमित सपकाळ, हसन तडवी, राजू कांबळे, मोहन पवार, ओकार यादव, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रविराज वर्णेकर, रोहित निकम, प्रविण पवार, विशाल पवार, संकेत निकम, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, विजय निकम, महाबळेश्वर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार जितेंद्र कांबळे, नवनाथ शिंदे, सलिम सय्यद यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी झाले होते. कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.