डॉ. अशोक गुजर इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी ,कराड मध्ये ‘डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झाम’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जी. के. गुजर मेमोरिअल चारिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. अशोक गुजर इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी , कराडमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोम ईन फार्मसी एक्झिट एक्झाम या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या नवीन परिपत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून भारतात डी. फार्मसी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्झिट एक्झाम अनिवार्य आहे , यावर्षी पासून सदर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच स्टेट फार्मसी कौन्सिलकडून फार्मासिस्टचा परवाना मिळणार आहे .याविषयी सर्व विद्यार्थी, कॉलेजेस यांना माहिती होण्यसाठी डॉ. अशोक गुजर इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी , कराड यांच्यावतीने डी फार्मसी एक्झिट एक्झाम या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेमध्ये परीक्षेचे स्वरूप, त्याचा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी या विषयी रिचा पाहवा यांनी मार्गदर्शन केले. हि परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे सदर परीक्षा ही डी फार्मसीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल , या परीक्षेमुळे फार्मासिस्टची गुणवत्ता नक्की वाढेल, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन पाटील यांनी केले.
कार्यशाळेचे समन्वयक म्हणून, प्रा. अतुल कदम यांनी काम केले, सदर कार्यशाळेमध्ये १६४ विद्यार्थी व १६ शिक्षकांनी सहभाग घेतला. सदर कार्यशाळा संथेचे चेअरमन डॉ. अशोक गुजर, व्हाईस चेअरमन श्री. इंद्रजीत गुजर, सचिव डॉ . माधुरी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.