डॉ. अशोक गुजर फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्मसी व जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह संपन्न
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील डॉ. अशोक गुजर इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय फार्मसी सप्ताहात ‘रुग्णाच्या सुरक्षिततेतील फार्मसिस्टचे महत्व’ या संकल्पनेवर आधारित व जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह निमित्त प्रतिजैविकाचा योग्य वापर व त्याच्या रेझिन्टन्सच्या धोक्यापासून वाचण्यासाठी घ्यावयाची काळजी विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
जगात प्रतिजैविक प्रतिकाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो. ऑटिमायक्रोबीयल रेझिन्टन्स ( एएमआर) हे मानवासाठी नाही तर प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे, सर्वच क्षेत्रात प्रतिजैविकांचा गरजेनुसार वापर करण्याची गरज आहे.
दरवर्षी लाखो रुग्ण यामुळे दगावतात. तरी डॉक्टरांच्या सल्ल्यायाशिवाय अॅंटिबायोटिक्स वापरू नयेत तसेच फार्मासिस्टनी रुग्णास अॅंटिबायोटिक्सचा वापर कसा करावा याविषयी समुपदेशन करावे, असे प्रतिपादन महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अतुल कदम यांनी केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक गुजर, उपाध्यक्ष इंद्रजीत गुजर, सचिव डॉ. माधुरी गुजर यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सप्ताहाच्या निमित्ताने डॉ. गुजर फार्मसी महविद्यालयाच्या विद्यार्थांनी प्रतिजैविकांचा योग्य व आवश्यक वापराबाबत भितीपत्रके वाटून व माहिती देऊन जनजागृती केली. या निमित्ताने विद्यार्थांना त्यांचे या विषयातील ज्ञान विस्तारण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अस्मित कांबळे, प्रा. ऋतुजा गायकवाड यांनी काम पाहिले.