डॉ. गुजर टेक्निकल कॅम्पस व एवोल्विंगएक्स सर्विसेस पुणे यांच्यात सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व इंटर्नशिप मिळण्यासाठी होणार मदत
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जी. के. गुजर मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कराड व डॉ अशोक गुजर इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी यांचा एवोल्विंगएक्स सर्विसेस पुणे यांच्या दरम्यान सामंज करार संपन्न झाला. सदर सामंजस्य करार संथेचे चेअरमन डॉ. अशोक गुजर, व्हाईस चेअरमन श्री. इंद्रजीत गुजर, सचिव डॉ. माधुरी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कराराअंतर्गत डॉ. गुजर टेक्निकल कॅम्पस मधील इंजिनियरिंग व फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा कौशल्य व सर्वगुण संपन्न विकास व्हावा ह्या उद्देशाने एवोल्विंगएक्स सर्विसेस पुणेचे अधिकारी विद्यार्थांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देतील. तसेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व इंटर्नशिप मिळण्यासाठी ही मदत होईल, त्याच बरोबर विविध विषयावर तज्ञाचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येतील व एकत्रितपणे संशोधनपर प्रकल्प राबिवण्यात येतील.
याप्रसंगी बोलताना, “आमच्या महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थीहित पूरक उप्रकम राबिवले जातात, जसे कि कॅम्पस इंटरव्ह्यूव व विविध विषयावर कार्यशाळा. मागील वर्षी एकूण १५० विद्यार्थी विविध राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाले आहेत. तसेच इंजिनियरिंग कॉलेजला नॅक व एनबीए मानांकन प्राप्त आहे, तसेच मागील वर्षी पासून बी. फार्मसी हा अभ्यासक्रम तसेच चालू वर्षी बीसीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.” असे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. माधव कुमठेकर यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. माधव कुमठेकर, इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला, उप प्राचार्य प्रा. एच. एम. कुंभार, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, एवोल्विंगएक्सचे प्रमुख अमोल निटवे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.