चांगभलं ऑनलाइन | कराड
काले गावच्या रहिवाशी श्रीमती अंजली अनंतराव देसाई यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी रविवारी दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांना संपूर्ण परिसर काकी या नावाने ओळखत होता.
त्या उद्योजक डॉ. अजित अनंतराव देसाई यांच्या मातोश्री होत. तसेच कृष्णा कारखान्याच्या माजी संचालिका व कोयना बँकेच्या माजी संचालिका सौ. डॉ. उमा अजित देसाई यांच्या त्या सासूबाई होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंजली देसाई यांच्या निधनाबद्दल काले ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.